IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : पाऊस थांबला, पण BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या अन्यथा

गतविजेता गुजरात टायटन्स आणि पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर २ सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:03 PM2023-05-26T19:03:26+5:302023-05-26T19:04:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi :  The rain has stopped in Ahmedabad, Toss has been delayed due to rain, The umpires will inspect the ground at 7:20 PM IST. | IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : पाऊस थांबला, पण BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या अन्यथा

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : पाऊस थांबला, पण BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या अन्यथा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा दुसरा फायनलिस्ट आज मिळणार आहे. गतविजेता गुजरात टायटन्स आणि पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर २ सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. क्वालिफायर १मध्ये GTवर विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर एलिमिनेटरमध्ये MI ने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले होते. पण, नाणेफेक सुरू होण्यास अर्ध्या तासाचा वेळ आहे, परंतु पावसाने हजेरी लावल्याने धाकधुक वाढली होती. पण, आता पाऊस थांबला आहे. पण, बीसीसीआयने महत्वाचे अपडेट्स दिले आहेत.


पाऊस थांबला असला तरी मैदानावर पाणी साचलेलं दिसत आहे आणि सुपर सॉकरने मैदान सुकवण्याचे काम सुरू आहे. ११.५६ ला सामना सुरू झाल्यास  ५-५ षटकांचा सामना होईल. १२.२६ पर्यंत सामना झालाच नाही, तर सुपर ओव्हर मध्ये निकाल लागेल. पाऊस तांबला असल्याने चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले, पण अजूनही विजा चमकत आहेत आणि पाऊस पुन्हा येऊ शकतो. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्स नुसार ७.२० वाजता मैदानाची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मुंबई इंडियन्सचे खेळाडू सरावासाठी मैदानावर आले आहेत. 

पावसाचा मुंबई इंडियन्सला बसला असता फटका  
IPL च्या नियमांनुसार, पात्रता फेरी रद्द झाल्यास, गुजरात टायटन्स संघाला फायनलमध्ये CSKच्या संघाविरूद्ध खेळायची संधी मिळणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास साखळी फेऱीत सर्वाधिक गुण असलेला संघ फायनल खेळेले. गुजरातने २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते, तर मुंबईचे केवळ १६ गुण होते. 

Web Title: IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi :  The rain has stopped in Ahmedabad, Toss has been delayed due to rain, The umpires will inspect the ground at 7:20 PM IST.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.