IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मैदानाची पाहणी झाली, मॅचची वेळ ठरली; बघा किती षटकांची मॅच ठरली

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या क्वालिफायर २ सामन्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधुक वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:22 PM2023-05-26T19:22:11+5:302023-05-26T19:22:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : Update from Ahmedabad!  Good news for cricket fans, Toss at 7.45 PM IST, Start of Play: 8.00 PM IST   | IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मैदानाची पाहणी झाली, मॅचची वेळ ठरली; बघा किती षटकांची मॅच ठरली

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मैदानाची पाहणी झाली, मॅचची वेळ ठरली; बघा किती षटकांची मॅच ठरली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या क्वालिफायर २ सामन्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधुक वाढवली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने हजेरी लावल्याने गुजरात टायटन्समुंबई इंडियन्स लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. पण, या पावसाची गुजरातला फार चिंता नव्हती कारण साखळी सामन्यात त्यांनी सर्वाधिक २० गुण मिळवले होते आणि आजचा सामना रद्द झाल्यास ते फायनलमध्ये खेळणे निश्चित होते. त्यामुळे MI चे चाहते प्रार्थना करत होते. ७ वाजता पाऊस थांबला, पण मैदानावर पाणी साचलेलं होतं आणि सुपर सॉकरने मैदान सुकवण्याचे काम सुरू होतं.  

अजूनही विजा चमकत आहेत आणि पाऊस पुन्हा येऊ शकतो. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्स नुसार ७.२० वाजता मैदानाची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मुंबई इंडियन्सचे खेळाडू सरावासाठी मैदानावर आले आहेत. रोहित शर्मा व आशिष नेहरा यांनी खेळपट्टीची पाहणी केली. मॅच रेफरी व पंचही मैदानावर आले आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी दोन्ही कर्णधारांची चर्चा केली. त्यानुसार आता ७.४५ वाजता नाणेफेक होईल आणि ८ वाजता सामना सुरू केला जाईल. ही मॅच २०-२० षटकांचीच होणार असल्याने चाहते आनंदात आहेत. 

Web Title: IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : Update from Ahmedabad!  Good news for cricket fans, Toss at 7.45 PM IST, Start of Play: 8.00 PM IST  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.