IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. गुजरात टायटन्सनच्या २३३ धावांचा पाठलाग करताना त्यांचे दोन फलंदाज २९ धावांत तंबूत परतले. त्यात इशान किशनला दुखापतीमुळे फलंदाजीला येता नाही आले आणि कॅमेरून ग्रीनही दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. इशा
शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. त्याने ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावा चोपल्या. शुबमन आणि वृद्धीमान साहा ( १८) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर शुबमन व साई सुदर्शनसह ६४ चेंडूंत १३८ धावा जोडल्या. सुदर्शनला ४३ ( ३१ चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानाव आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने १३ चेडूंत २८ धावा करताना गुजरातला ३ बाद २३३ धावांपर्यंत पोहोचवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला धक्क्यांमागून धक्के बसले. GTच्या डावात १६व्या षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाईमच्या वेळी ख्रिस जॉर्डनचा कोपरा
इशान किशनच्या डोळ्यावर आदळला अन् त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो सलामीला आलाच नाही. इम्पॅक्ट खेळाडू नेहर वढेरा ( ४) मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात माघारी परतला. कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या चेंडूने दुखापतग्रस्त केले. चेंडू जोरात ग्रीनच्या हातावर आदळला अन् त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. त्यानंतर शमीने दुसरा धक्का देताना रोहित शर्माला ( ८) झेलबाद केले. इशान फलंदाजीला येणार नसल्याचे फ्रँचायझीने जाहीर केले अन् कन्कशन सबस्टीट्यूड म्हणून विष्णू विनोद फलंदाजीला येणार आहे.
तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. तिलकवने ५व्या षटकात मोहम्मद शमीला ४,४,४,४,२,६ अशा २४ धावा चोपून काढल्या. या दोघांनी २१ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. राशीद खानने सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिलकचा दांडा उडवला. तिलक ४३ ( १४ चेंडू) धावावंर बाद झाला अन् मुंबईच्या ३ बाद ७२ धावा झाल्या.
Web Title: IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : Vishnu Vinod will be a concussion sub for Ishan Kishan, Tilak Varma out on 43 in just 14 balls with 5 fours and 3 sixes Mumbai indian 72/3
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.