IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. गुजरात टायटन्सनच्या २३३ धावांचा पाठलाग करताना त्यांचे दोन फलंदाज २९ धावांत तंबूत परतले. त्यात इशान किशनला दुखापतीमुळे फलंदाजीला येता नाही आले आणि कॅमेरून ग्रीनही दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. इशा
शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. त्याने ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावा चोपल्या. शुबमन आणि वृद्धीमान साहा ( १८) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर शुबमन व साई सुदर्शनसह ६४ चेंडूंत १३८ धावा जोडल्या. सुदर्शनला ४३ ( ३१ चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानाव आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने १३ चेडूंत २८ धावा करताना गुजरातला ३ बाद २३३ धावांपर्यंत पोहोचवले.
तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. तिलकवने ५व्या षटकात मोहम्मद शमीला ४,४,४,४,२,६ अशा २४ धावा चोपून काढल्या. या दोघांनी २१ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. राशीद खानने सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिलकचा दांडा उडवला. तिलक ४३ ( १४ चेंडू) धावावंर बाद झाला अन् मुंबईच्या ३ बाद ७२ धावा झाल्या.