Join us  

IPL 2023 : अम्पायरच्या निर्णयावर केलं वादग्रस्त विधान; BCCI ने आर अश्विनवर केली कारवाई, मोजावी लागेल 'किंमत'! 

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:15 PM

Open in App

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याने  बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान अम्पायरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. या सामन्यात पंचांनी 'दव'चा हवाला देत खेळाडूंना न विचारता चेंडू बदलला होता. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत अश्विन म्हणाला, “मला खूप आश्चर्य वाटले जेव्हा पंचांनी सामन्यात चेंडू बदलला आणि दव पडल्यामुळे स्वतःच निर्णय घेतला. मी याआधी असे घडताना पाहिले नव्हते.''

तो पुढे म्हणाला, “या मोसमात पंचांच्या काही निर्णयांनी मला त्रास दिला आहे. खरे सांगायचे तर, हे निर्णय चांगले आणि वाईटही आहेत, परंतु आपल्याला समतोल साधण्याची गरज आहे. पंचांनी न विचारता जुना चेंडू बदलला. एक गोलंदाज म्हणून आम्ही चेंडू बदलण्यास सांगितले नाही, पण अम्पायरने स्वतःहून निर्णय घेतला आणि चेंडू बदलला. मी पंचांना कारण विचारले, ते म्हणाले की आम्ही ते करू शकतात. ''

आता अश्विनच्या याच विधानामुळे त्याच्यावर कारवाई केली गेली आहे. आयपीएल नियमांचे उल्लंघन करण्याचा ठपका ठेवत अश्विनला त्याच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३आर अश्विन
Open in App