- अयाज मेमन
जयपूर : कामगिरीत सातत्य नसलेल्या लखनौ सुपर जायंट्सला विजयी पथावर पोहोचायचे झाल्यास अव्वल स्थानावर काबीज असलेल्या राजस्थान रॉयल्सला नमविण्यासाठी बुधवारी सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागणार आहे. प्रतिभा असली तरी सातत्याअभावी लखनौला पाचपैकी केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले. राजस्थानने पाचपैकी चार सामने जिंकले. त्यातही ओळीने तीन विजय नोंदविले.
राजस्थान रॉयल्स
कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर अशा बलाढ्य फलंदाजांचा भरणा.
युझवेंद्र चहल, ॲडम झम्पा आणि रविचंद्रन अश्विन असे अव्वल दर्जाचे ‘मॅच विनर’ फिरकीपटू.
वेगवान माऱ्यासाठी ट्रेंट बोल्टसारख्या भेदक गोलंदाजाला संदीप शर्माची चांगली साथ लाभते.
लखनौ सुपर जायंट्स
कर्णधार लोकेश राहुलच्या नेतृत्वात काइल मेयर्स, निकोलस पुरन, मार्क्स स्टोयनिस या ‘पॉवर हिटर्स’चा भरणा.
दीपक हुड्डाचे अपयश चिंतेचा विषय. रवी बिश्नोई, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या यांच्याकडून फिरकीची कमाल अपेक्षित.
मार्क वुड, आवेश खान, युद्धवीर चरक या वेगवान गोलंदाजांवर लवकर यश मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
स्थळ: जयपूर,
वेळ: सायंकाळी ७.३० पासून
Web Title: IPL 2023: Rajasthan Royals face big challenge against Lucknow Supergiants
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.