Ravi Shastri Virat Kohli, IPL 2023: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विश्वास आहे की सध्या खेळत असलेला एक धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा एक मोठा विक्रम नक्कीच मोडीत काढू शकतो. 2016 च्या आयपीएलमध्ये एका हंगामात 973 धावा करण्याचा विराटचा विक्रम आहे. विराटने 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 81.08 च्या सरासरीने आणि 152 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने चार शतके आणि सात अर्धशतके झळकावली होती. जर एखाद्या फलंदाजाने विराट कोहलीचा हा 973 धावांचा विक्रम मोडला, याचा अर्थ त्या फलंदाजाला एका मोसमात 1000 धावा करणे फारसे अवघड असणार नाही. अशी कामगिरी सध्या एक फलंदाज करू शकतो असे रवी शास्त्री म्हणाले आहेत.
कोण आहे हा फलंदाज?
रवी शास्त्री म्हणाले की, गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल हा सलामीवीर हा तुफान फॉर्मात आहे. त्यामुळे त्याच्याकडे धावा करण्याच्या अधिक संधी आहेत. तोही चांगल्या फॉर्ममध्ये असून महत्त्वाचे म्हणजे तो सलामीवीर आहे. त्यामुळे पुढच्या 2-3 डावात त्याने 80-100 धावा सातत्याने केल्या तर तो 300-400 धावांपर्यंत पोहोचू शकेल. अशा वेळी मग त्याला पुढे संधी मिळत राहिला आणि मग एका मोसमात 900 धावांचा टप्पा ओलांडणे फारसे कठीण नक्कीच नाही.
भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके
शुभमन गिलने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. गेल्या वर्षी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आणि देशासाठी पहिले शतक झळकावले. यानंतर त्याने बांगलादेशमध्ये कसोटीतही शतक झळकावले आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-20मध्येही शतक झळकावले. या वर्षी त्याने दर महिन्याला शतक झळकावले आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडून आयपीएलमध्येही चांगली कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या वर्षी गुजरात संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.