MS Dhoni Virat Kohli Viral Video, IPL 2023: शोले चित्रपटातील एक लोकप्रिय गाणं साऱ्यांनाच आजही आठवत असेल, ते म्हणजे.. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे... असाच काहीसा प्रकार IPL सामन्यानंतर पाहायला मिळाला. सामन्यात दोन कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आमनेसामने उभे ठाकलेले विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सामन्यानंतर मात्र एकमेकांशी गप्पा मारताना, धमाल मस्ती करताना दिसले. CSK विरुद्धच्या सामन्यात RCB ला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दोघेही क्रिकेटला धर्म मानतात, पण क्रिकेट हे मैदानातच असते आणि मैत्री ही मैदानाबाहेर कायम असते याचा प्रत्यय चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आला. दोन स्टार क्रिकेटर एकाच फ्रेममध्ये आले आणि सारेच कॅमेरे त्यांच्याकडे वळले. त्यानंतर या दोघांमधील गप्पा आणि धमाल मस्ती टिपण्याचा मोह कॅमेरामन ला देखील आवरला नाही. त्याच संबंधीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
धोनीला भेटून विराट विसरला पराभवाचे दु:ख!
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये धोनी आणि विराट एकत्र बोलताना दिसले, त्यावेळी कॉमेंटेटर देखील मॅचबद्दल बोलायचं सोडून या दोघांच्या मैत्रीच्या आठवणीत रमले. कॅमेऱ्याचा संपूर्ण फोकस या दोघांवरच दिसून आला. सामन्याबद्दल कमी आणि या दोघांच्या मैत्रीच्याच जास्त चर्चा रंगल्या. धोनी आणि विराट यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यांच्या बोलण्यातून एक स्पष्ट दिसले की ते गंभीर विषयावर बोलत नसल्याने विराट त्याच्या संघाच्या पराभवाचे दु:ख काही काळ विसरला.
याआधीही धोनी-विराटच्या मैत्रीची झालीय चर्चा
धोनी-विराट यांच्या मैत्रीची ही पहिलीच वेळ नाही. दोघांचे एकत्र बोलणे, हसणे आणि मस्करी करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. याआधीही दोघांचे असे व्हिडिओ खूप चर्चेत आले आहेत. धोनीने विराटचे कौतुक करताना आणि विराटने धोनीचे गोडवे गाताना अनेकवेळा जगाने पाहिले आहे. अशा स्थितीत चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर जे काही दाखवण्यात आले, त्यात नवीन काहीच नव्हते. उलट, या दोघांमधील अतुलनीय बॉन्डिंगचे अजूनही कायम आहे पाहून सर्व चाहते सुखावल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2023 RCB vs CSK Virat Kohli MS Dhoni meet up gossips fun laughter after match video viral on social media fans applauds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.