IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आता सामन्यातील चुरस अधिक वाढताना दिसतेय... मागील आठवडाभरात झालेला प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झाला. आजही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना क्षणाक्षणाला कलाटणी घेताना दिसतोय... विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर DC ने हॅटट्रिक साजरी करून मॅच फिरवली. IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सच्या राशीद खान याने पहिली हॅटट्रिक नोंदवली आहे.
विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा विक्रम; अनुष्का शर्माला झाला आनंद, वाजवल्या जोरजोरात टाळ्या
फॅफ ड्यू प्लेसिस व कोहली या दोघांनी ४.४ षटकांत ४२ धावा फलकावर चढवताना DC चे टेंशन वाढवले होते. पण, मिचेल मार्शच्या त्या षटकात अमन खानने अविश्वसनीय झेल घेऊन फॅफला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. महिपाल आणि विराट यांनी खणखणीत फटके खेचले. या दोघांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. विराटला ३४ चेंडूंत ६ चौकार व १षटकारांसह ५० धावांवर माघारी जावे लागले. महिपालची १८ चेंडूंत २६ धावांची खेळी मार्शने संपुष्टात आणली.
ग्लेन मॅक्सवेलने आल्या आल्या खणखणीत षटकार खेचून चेंडू हरवून टाकला. पाचव्या क्रमांकावर हर्षल पटेल फलंदाजीला आला अन् तो ६ धावांवर माघारी परतला. १४व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर हर्षल पटेल बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु अभिषेक पोरेलने त्याला स्टम्पिंग केले. चौथ्या पंचाकडे निर्णय गेला अन् त्यात चेंडू व बॅटचा स्पर्श झाल्याचे दिसले अन् पटेलला स्टम्पिंग ऐवजी झेलबाद दिले गेले. त्यानंतर कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर ग्लेन मॅक्सवेल ( २४) व दिनेश कार्तिक यांची विकेट घेतली. दिल्लीने आज टीम हॅटट्रिक साजरी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"