IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना एकतर्फी होताना दिसत आहे. RCBच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ने तीन फलंदाज अवघ्या २ धावांवर गमावले आहेत. दिल्लीने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला मैदानावर उतरवले, परंतु तो दोन चेंडू खेळून माघारी परतला. आयपीएल २०२३ मध्ये त्याने १२, ७, ०, १५ व ० अशी कामगिरी केली आहे. आज तर त्याने स्वतः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्यापाठोपाठ मिचेल मार्श व यश धुल हेही माघारी परतल्याने दिल्लीची अवस्था ३ बाद २ धावा अशी दयनीय झाली.
W,W,W! आयपीएलमध्ये नोंदवली गेली दुसरी हॅटट्रिक; स्टम्पिंगसाठी अपील पण, झाला झेलबाद, Video
विराट कोहली ( ५०) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( २२) यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.४ षटकांत ४२ धावा फलकावर चढवताना DC चे टेंशन वाढवले होते. महिपाल लोम्रोर आणि विराट यांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. विराटला ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारांसह ५० धावांवर माघारी जावे लागले. महिपालची १८ चेंडूंत २६ धावांची खेळी संपुष्टात आली. पाचव्या क्रमांकावर हर्षल पटेलला पाठवले गेले, पण त्याचा फार उपयोग झाला नाही. अक्षर पलेलने 14व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. त्यानंतर पुढील षटकात कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर ग्लेन मॅक्सवेल ( २४) व दिनेश कार्तिक यांची विकेट घेतली. दिल्लीने आज टीम हॅटट्रिक साजरी केली. अनुज रावत ( १५) आणि शाहबाज अहमदने ( २०) RCBला सन्मानजनक पल्ला गाठून दिला.
RCB ने ५ बाद १७४ धावा केल्या. RCB ने पहिल्या १३.५ षटकांत ३ बाद १३२ धावा केल्या आणि नंतर त्यांना ३७ चेंडूंत ४२ धावाच करता आल्या. पृथ्वी शॉसाठी यंदाचे पर्व काही खास जाताना दिसत नाही. डेव्हिड वॉर्नर आज स्ट्राईकवर आला आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. वॉर्नरला दोन धावा हव्या होत्या, परंतु पृथ्वीने त्याला माघारी पाठवले. त्यामुळे वॉर्नर काहीसा निराश झाला. तिसरा चेंडू निर्धाव खेळून काढल्यानंतर पृथ्वीने पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला. इम्पॅक्ट प्लेअर आलेल्या अनुज रावतने डाईव्ह मारून अचूक थ्रो केला अन् पृथ्वीला भोपळ्यावर रन आऊट होऊन माघारी जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वाधिक ७ वेळा शून्यावर बाद होण्याच्या वीरेंद्र सेहवागच्या नकोशा विक्रमाशी आज पृथ्वीने बरोबरी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"