Join us  

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास घडविला; १२वी धाव करताच नंबर १ ठरला!

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहली याने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 7:44 PM

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहली याने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने चौकार खेचून १२ धावा केल्या अन् आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला. आयपीएल इतिहासात ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केदार जाधव आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे.चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अन् सध्या मराठी समालोचन करणाऱ्या केदारच्या अनपेक्षित एन्ट्रीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. इंग्लंडचा ऑल राऊंडर विली यंदाच्या आयपीएलमझ्ये RCBसाठी चार सामने खेळला अन् ३ विकेट्स घेतल्या. पण, त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. केदारने २०१०मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि त्याने ९३ सामन्यां त११९६ धावा केल्या आहेत. त्याने RCB कडून १७ सामने खेळले आहेत. १ कोटींच्या मुळ किमतीत तो आता पुन्हा बंगळुरूच्या ताफ्यात दाखल झाला आहे. 

फॅप ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. आयपीएलमध्ये ५५००, ६०००, ६५०० आणि ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

 

Most runs scored in IPL :-

7004* - Virat Kohli

6536 - Shikhar Dhawan

6189 - David Warner

6063 - Rohit Sharma

5528 - Suresh Raina

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App