IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी Delhi Boy विराट कोहलीच्या संघाची दणदणीत धुलाई केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १८२ धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टने ( Phil Salt ) ने वादळी फटकेबाजी केली. त्याने केवळ चौकार-षटकाराने १४ चेंडूंत ६८ धावा कुटल्या, परंतु त्याचे शतक थोडक्यात हुकले. त्याने दिल्लीचा विजय निश्चित केला होता आणि अन्य फलंदाजांनी औपचारिकता पूर्ण केली. आजचा सामना जिंकून RCBला Point Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी होती, परंतु DC ने विजय मिळवताना ८ गुणांसह आगेकूच केली.
तू गप्प बस, तू नको सांगू! मोहम्मद सिराज DCच्या फिल सॉल्टवर भडकला, वॉर्नर मध्ये पडला
सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर आज वेगळ्याच मूड मध्ये दिसले अन् त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरूवात केली. दोघांनी ५.१ षटकांत ६० धावा फलकावर चढवल्या. जोश हेझलवूडने वॉर्नरची ( २२) विकेट मिळवून दिली. सिराजच्या गोलंदाजात सॉल्टने पहिले तीन चेंडू ६,६,४ असे भिरकावून लावले आणि त्यानंतर दोघांमध्ये भांडण झालेले दिसले. वॉर्नरच्या विकेटनंतर सॉल्टने सर्व सूत्रं हाती घेतली आणि २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मिचेल मार्शनेही आल्याआल्या हेझलवूडला खणखणीत षटकार खेचला. सॉल्टचा आजचा खेळ हा विशेष प्रभावीत करणारा ठरला. त्याने महिपालने टाकलेल्या १०व्या षटकात १३ धावा कुटल्या आणि संघाला १ बाद ११५ धावांपर्यंत पोहोचवले. दिल्लीला ६० चेंडूंत ६७ धावा करायच्या होत्या.
११व्या षटकात हर्षल पटेल गोलंदाजीवर आला अन् मार्शने पहिलाच चेंडू चौकार भिरकावला. पुढचा चेंडू हर्षलने लोव्हर फुलटॉस फेकला अन् मार्शचा फटका चूकला. तो १७ चेंडूंत २६ धावांवर झेलबाद झाला आणि सॉल्टसोबतची ३२ चेंडूंतील ५९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. सॉल्ट केवळ उत्तुंग फटकेच खेचत नव्हता, तर तो अधूनमधून दोन-दोन धावाही चोरताना दिसला. १२व्या षटकात वनिंदू हसरंगाच्या अप्रतिम फिरकी चेंडूवर सॉल्टच्या बॅटची कड लागली होती, परंतु यष्टिरक्षक कार्तिकने झेल टाकला.
रायली रूसोनेही १३व्या षटकात हर्षलला दोन खणखणीत षटकार खेचले आणि त्यात RCBकडून क्षेत्ररक्षणात चूक झाली. त्या षटकात २४ धावांची भर घालून DC ने १५० धावांचा टप्पा गाठला. आता सामना हातात असल्याने दिल्लीच्या फलंदाजांनी धोका न घेता चतुर खेळ करण्यावर भर दिला. विजयासाठी ११ धावांची गरज असताना नायक सॉल्ट त्रिफळाचीत झाला. त्याने ४५ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली. दिल्लीने १६.४ षटकांत ३ बाद १८७ धावा करून मॅच जिंकली. रूसो २२ चेंडूंत नाबाद ३५ धावा केल्या.
तत्पूर्वी, फॅफ ड्यू प्लेसिस ( ४५) व विराट कोहली ( ५५) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने फॅफ आणि ग्लेन मॅक्सवल ( ०) यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवले. विराट व महिपाल लोम्रोर यांनी ३२ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली. कार्तिक ११ धावांवर वॉर्नरच्या हाती झेलबाद झाला. महिपाल २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. RCB ने ४ बाद १८१ धावा केल्या.