Join us  

विराट कोहलीचा 'रेकॉर्ड'तोड खेळ, महिपाल लोम्रोरची वादळ; दिल्लीत RCBची हवा

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या मैदानावर क्रिकेट कोळून प्यायला..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 9:13 PM

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या मैदानावर क्रिकेट कोळून प्यायला... त्याच दिल्लीच्या मैदानावर आज त्याने विक्रमांचा पाऊस पाडला... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात विराट हाच केंद्रस्थानी होता आणि त्याने चाहत्यांना निराश नाही केले. ४ मोठे विक्रम नोंदवताना त्याने RCBसाठी धांवाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला. फॅफ ड्यू प्लेसिससह ८२ आणि महिपाल लोम्रोरसह ५५ धावांची भागीदारी करून त्याने DCच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.

विराट कोहलीने नोंदवले ४ मोठे विक्रम! हिटमॅन, गब्बरसह अनेकांना मागे टाकले

RCBने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.फॅप ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. विराटने दुसऱ्या षटकात चौकार खेचून १२वी धाव पूर्ण केली अन् आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला. आयपीएल इतिहासात ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. विराट व फॅफ यांनी चांगले फटके मारताना पॉवर प्लेमध्ये बिनबाद ५६ धावा संघासाठी उभारल्या. या दोघांची फटकेबाजी रोखण्यासाठी DC कर्णधार डेव्हिड वॉर्नर गोलंदाजीत सातत्याने बदल करत होता, परंतु त्यांनाही यश मिळत नव्हते.

कुलदीप यादव व अक्षर पटेल या दिल्लीच्या यशस्वी गोलंदाजांनाही आज RCBच्या सलामीवीरांनी झोडले. विराटने आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि दिल्लीविरुद्ध असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला.  विराट व फॅफ यांची ८२ धावांची भागीदारी मिचेल मार्शने १२व्या षटकात तोडली. फॅफ ३२ चेंडूंत ४५ धावा करून अक्षर पटेलच्या हाती झेल देऊन परतला. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवले गोल्डन डकवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ( Video दोन चेंडू, दोन विकेट्स )  महिपाल लोम्रोरने तिसऱ्या विकेटसाठी विराटला चांगली साथ दिली. कुलदीपने ४ षटकांत ३७  धावा दिल्या. विराटने ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे यंदाच्या पर्वातील सहावे अर्धशतक ठरले. विराटचे हे आयपीएलमधील एकूण पन्नासावे अर्धशतक ठरले. 

मुकेश कुमारने १६व्या षटकात विराट कोहलीची विकेट घेतली. किंग कोहली ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावांवर झेलबाद झाला. विराट व महिपाल यांनी ३२ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली. केदार जाधवला आज संधी दिली, परंतु दिनेश कार्तिकला फलंदाजीला पुढे पाठवले गेले. महिपालला त्याची चांगली साथ मिळाली. महिपालने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक ११ धावांवर वॉर्नरच्या हाती झेलबाद झाला. महिपाल २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. RCB ने ४ बाद १८१ धावा केल्या. 

 

 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App