IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर RCBची गाडी घसरली; कुलदीप यादव, मिचेल मार्शने मॅच फिरवली

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना क्षणाक्षणाला कलाटणी घेताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 05:13 PM2023-04-15T17:13:35+5:302023-04-15T17:13:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs DC Live : RCB post the total of 174/6 in 20 overs. Virat Kohli scored 50 runs for RCB. Kuldeep & Marsh picked 2 wickets each.  | IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर RCBची गाडी घसरली; कुलदीप यादव, मिचेल मार्शने मॅच फिरवली

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर RCBची गाडी घसरली; कुलदीप यादव, मिचेल मार्शने मॅच फिरवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना क्षणाक्षणाला कलाटणी घेताना दिसला. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर DC ने सांघिक हॅटट्रिक साजरी करून मॅच फिरवली. महिपाल व मॅक्सवेल यांनीही झंझावाती फटकेबाजी केली अन् अखेरच्या षटकांत अनुज रावत व शाहबाज अहमद यांनी खिंड लढवताना DC समोर तगडे आव्हान उभे केले. RCB ने पहिल्या १३.५ षटकांत ३ बाद १३२ धावा केल्या आणि नंतर त्यांना ३७ चेंडूंत ४२ धावाच करता आल्या.  

IPL 2023, RCB vs DC Live : W,W,W! आयपीएलमध्ये नोंदवली गेली दुसरी हॅटट्रिक; स्टम्पिंगसाठी अपील पण, झाला झेलबाद, Video 

फॅफ ड्यू प्लेसिस व कोहली या दोघांनी ४.४ षटकांत ४२ धावा फलकावर चढवताना DC चे टेंशन वाढवले होते. पण, मिचेल मार्शच्या त्या षटकात अमन खानने अविश्वसनीय झेल घेऊन फॅफला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. महिपाल आणि विराट यांनी खणखणीत फटके खेचले. या दोघांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. विराटला ३४ चेंडूंत ६ चौकार व १षटकारांसह ५० धावांवर माघारी जावे लागले. महिपालची १८ चेंडूंत २६ धावांची खेळी मार्शने संपुष्टात आणली. 

पाचव्या क्रमांकावर हर्षल पटेल फलंदाजीला आला अन् तो ६ धावांवर माघारी परतला. १४व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर हर्षल पटेल बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर ग्लेन मॅक्सवेल ( २४) व दिनेश कार्तिक यांची विकेट घेतली. दिल्लीने आज टीम हॅटट्रिक साजरी केली. अनुज रावत ( १५) आणि शाहबाज अहमदने ( २०) RCBला सन्मानजनक पल्ला गाठून दिला. RCB ने ५ बाद १७४ धावा केल्या. कुलदीप व मार्शने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs DC Live : RCB post the total of 174/6 in 20 overs. Virat Kohli scored 50 runs for RCB. Kuldeep & Marsh picked 2 wickets each. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.