IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना एकतर्फी झाला. RCBच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ने ३ फलंदाज अवघ्या २ धावांवर गमावले. दिल्लीचा आधारस्तंभ डेव्हिड वॉर्नरला आज पदार्पणवीर विजयकुमार वैशाखने लवकर माघारी पाठवून DCची अडचण वाढवली. मनीष पांडेने अर्धशतकी खेळी करून RCBचं टेंशन वाढवलं होतं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. RCBने घरच्या मैदानावर पुन्हा विजयी लय मिळवली.
पृथ्वी शॉसाठी यंदाचे पर्व काही खास जाताना दिसत नाही. अनुज रावतने अचूक थ्रो करून पृथ्वीला भोपळ्यावर रन आऊट केले. मिशेच मार्श ( ०) व यश धुल ( १) यांना अनुक्रमे वेन पार्नेल व मोहम्मद सिराजने माघारी पाठवले. मनीष पांडेकडून आज उपयुक्त खेळीची अपेक्षा होती आणि वॉर्नर नेहमीप्रमाणे दिल्लीचा डाव सावरताना दिसला. त्याने सिराजला सलग तीन चौकार खेचले. विजयकुमार वैशाखच्या गोलंदाजीवर RCB ला मोठी विकेट मिळवून दिली. वॉर्नर १९ धावांवर विराटच्या हाती झेलबाद झाला. अभिषेक पोरेलही ( ५) हर्षल पटेलच्या फुलटॉसवर झेलबाद झाला.
अक्षर पटेल व मनीष पांडे चांगली भागीदारी करताना दिसले, परंतु वैशाखने पुन्हा एक झटका दिला. त्याने कटर बॉल फेकला अन् अक्षर त्यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात २१ धावांवर झेलबाद झाला. दिल्लीला ८० धावांवर सहावा धक्का बसला. मनीष अखेरची आशा दिल्लीसाठी होती आणि त्याने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. २०२१ नंतर त्याने आयपीएलमध्ये प्रथमच अर्धशतकी खेळी केली. पण, वनिंदू हसरंगाने हा अडथळा दूर केला. मनीष ३८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर बाद झाला. वैशाखने आज पदार्पणाचा सामना गाजवताना २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. अमन खान ( १८) याला बाद करून सिराजने डावातील दुसरी विकेट घेतली. दिल्लीला 9 बाद 151 धावा करता आल्या आणि RCB ने 23 धावांनी सामना जिंकला
तत्पूर्वी, विराट कोहली ( ५०) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( २२) यांनी ४३ धावांची भागीदारी करताना चांगली सुरूवात करून दिली. महिपाल लोम्रोर ( २६) आणि विराट यांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. हर्षल पटेलला पाचव्या क्रमांकावर पाठवले गेले, पण त्याचा उपयोग झाला नाही. कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर ग्लेन मॅक्सवेल ( २४) व दिनेश कार्तिक यांची विकेट घेतली आणि दिल्लीने टीम हॅटट्रिक साजरी केली. अनुज रावत ( १५) आणि शाहबाज अहमदने ( २०) RCBला सन्मानजनक पल्ला गाठून दिला. RCB ने ५ बाद १७४ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, RCB vs DC Live : Vijaykumar Vyshak impresses on his debut for RCB, take 3 wickets, RCB beat DC by 23 runs, dC loose fifth match in a row
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.