IPL 2023, RCB vs DC Live : वाह रे विराट! 'किंग' कोहलीनं नोंदवला IPLमधील सर्वात मोठा विक्रम, आसपासही नाही एकही फलंदाज

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म हा त्याच्या चाहत्यांना सुखावणारा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:20 PM2023-04-15T16:20:45+5:302023-04-15T16:21:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs DC Live : Virat Kohli becomes the first ever batter to complete 2,500 runs at a venue in the IPL - Chinnaswamy Stadium, Fifty for King Kohli ( 54)   | IPL 2023, RCB vs DC Live : वाह रे विराट! 'किंग' कोहलीनं नोंदवला IPLमधील सर्वात मोठा विक्रम, आसपासही नाही एकही फलंदाज

IPL 2023, RCB vs DC Live : वाह रे विराट! 'किंग' कोहलीनं नोंदवला IPLमधील सर्वात मोठा विक्रम, आसपासही नाही एकही फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म हा त्याच्या चाहत्यांना सुखावणारा आहे. RCBच्या माजी कर्णधाराच्या बॅटीतून धावा आग ओकताना दिसत आहेत आणि DCच्या गोलंदाजांचीही त्याने बेक्कार धुलाई सुरू ठेवली आहे. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजीसाठी RCBला बोलावले अन् फॅफ ड्यू प्लेसिस व कोहलीने त्यांच्या गोलंदाजावर हल्लाबोल करताना ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मागील ४ सामन्यांतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले आणि आयपीएलमधील ४७वे अर्धशतक ठरले.

विराट व फॅफ यांनी पहिल्या षटकापासून दिल्लीच्या गोलंदाजांना बदडण्यास सुरुवात केली. या दोघांनी १०च्या सरासरीने ४.४ षटकांत ४२ धावा फलकावर चढवताना DC चे टेंशन वाढवले होते. पण, मिचेल मार्शच्या त्या षटकात अमन खानने अविश्वसनीय झेल घेऊन फॅफला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. महिपाल आणि विराट यांनी खणखणीत फटके खेचले. या दोघांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. विराटलाही दोन जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा उचलताना त्याने अर्धशतक पूर्ण केले.

ललित यादवच्या फुलटॉस चेंडूवर विराटने उत्तुंग फटका मारला, परंतु सीमारेषेवर यश धुलने तो टिपला. विराटला ३४ चेंडूंत ६ चौकार व १षटकारांसह ५० धावांवर माघारी जावे लागले. दरम्यान आजच्या सामन्यात विराटने मोठा विक्रम नोंदवला. आयपीएलमध्ये एकाच स्टेडियमवर २५००+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने चिन्नास्वामी स्टेडियमवर हा पराक्रम केला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये विराट वगळता एकाही फलंदाजाला एकाच स्टेडियमवर २००० धावाही करता आलेल्या नाहीत. विराटने आयपीएलमध्ये एकूण २२७ सामन्यांत सर्वाधिक ६८१९ धावा केल्या आहेत आणि त्यात ४७ अर्धशतकं व ५ शतकांचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs DC Live : Virat Kohli becomes the first ever batter to complete 2,500 runs at a venue in the IPL - Chinnaswamy Stadium, Fifty for King Kohli ( 54)  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.