IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा विक्रम; अनुष्का शर्माला झाला आनंद, वाजवल्या जोरजोरात टाळ्या 

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आणखी एक अर्धशतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:46 PM2023-04-15T16:46:28+5:302023-04-15T16:50:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs DC Live : Virat Kohli is scored  Most runs against Delhi Capitals, he scored 999 runs, break Rohit Sharma record | IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा विक्रम; अनुष्का शर्माला झाला आनंद, वाजवल्या जोरजोरात टाळ्या 

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा विक्रम; अनुष्का शर्माला झाला आनंद, वाजवल्या जोरजोरात टाळ्या 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आणखी एक अर्धशतक झळकावले. चार सामन्यांतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. विराटच्या विकेटनंतर RCBच्या अन्य फलंदाजांना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी टप्प्याटप्प्याने माघारी पाठवले. RCB चा निम्मा संघ १३२ धावांवर माघारी परतला. दरम्यान, विराटने DC विरुद्ध मोठ्या विक्रमाची नोंद करताना हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला. पत्नी अनुष्का शर्मानेही विराटच्या आजच्या खेळीचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. 

 वाह रे विराट! 'किंग' कोहलीनं नोंदवला IPLमधील सर्वात मोठा विक्रम, आसपासही नाही एकही फलंदाज


नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजीसाठी RCBला बोलावले अन् फॅफ ड्यू प्लेसिस व कोहलीने त्यांच्या गोलंदाजावर हल्लाबोल करताना ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मागील ४ सामन्यांतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले आणि आयपीएलमधील ४७वे अर्धशतक ठरले. विराट व फॅफ यांनी पहिल्या षटकापासून दिल्लीच्या गोलंदाजांना बदडण्यास सुरुवात केली. या दोघांनी १०च्या सरासरीने ४.४ षटकांत ४२ धावा फलकावर चढवताना DC चे टेंशन वाढवले होते. पण, मिचेल मार्शच्या त्या षटकात अमन खानने अविश्वसनीय झेल घेऊन फॅफला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर महिपाल लोम्रोरचा सोपा झेल मनीष पांडेने टाकला. ( फॅफच्या विकेटचा व्हिडीओ पाहा


महिपाल आणि विराट यांनी खणखणीत फटके खेचले. या दोघांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. विराटला ३४ चेंडूंत ६ चौकार व १षटकारांसह ५० धावांवर माघारी जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक ९९९ धावांचा विक्रमही विराटने आज नावावर केला आणि त्याने रोहित शर्माचा ९७७ धावांचा विक्रम मोडला. अजिंक्य रहाणे ( ७९२) व रॉबिन उथप्पा ( ७४९) हे या क्रमवारीत पुढे येतात. विराटने DC विरुद्ध २७ सामन्यांत ५२.५७च्या सरासरीने ९९९ धावा केल्या आहेत आणि त्यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे.  दिल्लीविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे ( ७) व रोहित ( ६) यांचा क्रमांक येतो.  


दरम्यान, महिपालची १८ चेंडूंत २६ धावांची खेळी मार्शने संपुष्टात आणली. ग्लेन मॅक्सवेलने आल्या आल्या खणखणीत षटकार खेचून चेंडू हरवून टाकला. पाचव्या क्रमांकावर हर्षल पटेल फलंदाजीला आला अन् तो ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर ग्लेन मॅक्सवेल व दिनेश कार्तिक यांची विकेट घेतली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

Web Title: IPL 2023, RCB vs DC Live : Virat Kohli is scored  Most runs against Delhi Capitals, he scored 999 runs, break Rohit Sharma record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.