IPL 2023, RCB vs GT Live : विराट कोहलीने सातवे शतक ठोकले, अनुष्काने बेभान सेलिब्रेशन केले; Video Viral

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : विराट कोहलीने ( Virat Kohli) आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अविश्वसनीय खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 10:36 PM2023-05-21T22:36:10+5:302023-05-21T22:36:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs GT Live Marathi : king kohli smashed a brilliant 101* (61); A flying kiss from Anushka Sharma to Virat Kohli, Video  | IPL 2023, RCB vs GT Live : विराट कोहलीने सातवे शतक ठोकले, अनुष्काने बेभान सेलिब्रेशन केले; Video Viral

IPL 2023, RCB vs GT Live : विराट कोहलीने सातवे शतक ठोकले, अनुष्काने बेभान सेलिब्रेशन केले; Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : विराट कोहलीने ( Virat Kohli) आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अविश्वसनीय खेळी केली. त्याचा प्रत्येक फटका हा डोळ्यांना सुखावणारा होता. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर आता सर्वाधिक ७ शतकं झाली आहेत आणि बंगळुरूतील हे त्याचे चौथे शतक ठरले. आज त्याने हो दोन्ही मोठे विक्रम नावावर केले आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Anushka Sharma) त्याला सर्वांसमोर फ्लाईंग किस दिला. 


फॅफ ड्यू प्लेसिस ( २८) आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी यंदाच्या पर्वात मिळून ९३९ धावांची भागीदारी केली आणि ही आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम भागीदारी करणारी जोडी ठरली. गुजरात टायटन्सने ६७ धावांवर RCBला पहिला धक्का दिला अन् त्यानंतर विकेट्स पटापट पडल्या. विराटने एका बाजूने खिंड लढवताना आणखी एक शतक झळकावून GT समोर तगडे लक्ष्य उभे केले. ग्लेन मॅक्सवेल ( ११), दिनेश कार्तिक ( ०) व महिपाल लोमरोर ( १) माघारी परतल्याने RCB अडचणीत सापडले होते. पण, विराटने मायकेल ब्रेसवेलला ( २६) सोबत घेऊन २९ चेंडूंत ४७ धावा जोडल्या.   

मागच्या वर्षी आम्ही RCBवर उपकार केले होते, आता आशा करतो...! रोहित शर्मा  

विराट कोहली-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीने इतिहास रचला, आयपीएल २०२३चा हंगाम गाजवला 


विराटने ६० चेंडूंत आयपीएल २०२३ मधील दुसरे शतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे त्याचे ८वे शतक ठरले अन् त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम करताना ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. विराटने ६० चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह १०० धावा पूर्ण केल्या. RCB ने ५ षटकांत १९७ धावा केल्या. अनुज रावतनेही ( २३) विराटसह ६४ धावा जोडल्या.  विराट १०१ धावांवर नाबाद राहिला. 

 

Web Title: IPL 2023, RCB vs GT Live Marathi : king kohli smashed a brilliant 101* (61); A flying kiss from Anushka Sharma to Virat Kohli, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.