IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावून त्याचा क्लास दाखवून दिला, परंतु उगवता तारा असलेल्या शुबमन गिलने कमाल केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते आणि त्यांनी १९८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभंही केलं. पण, शुबमन व विजय शंकर यांनी RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले. फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर गुजरात टायटन्सलाही फायदा मिळेल, हे विराटने आधीच सांगितले होते. तसेच घडले अन् RCBचे पॅक अप झाले. गुजरातच्या विजयाने मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या सीटवरून प्ले ऑफमध्ये पोहोचले. GT vs CSK यांच्यात क्वालिफायर १चा सामना २३ मे रोजी चेन्नईतील चेपॉकवर होणार आहे, तर २४ मे रोजी MI vs LSG अशी एलिमिनेटर लढत होईल.
फॅफ ड्यू प्लेसिस ( २८) आणि विराट कोहली यांनी ६७ धावांची भागीदारी केली. पण, गुजरातने फॅफच्या विकेटनंतर पटापट धक्के दिले. विराटने एकहाती किल्ला लढवला. ग्लेन मॅक्सवेल ( ११), दिनेश कार्तिक ( ०) व महिपाल लोमरोर ( १) माघारी परतल्याने RCB अडचणीत सापडले होते. त्याने मायकेल ब्रेसवेलला ( २६) सोबत घेऊन २९ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. विराटने ६१ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह १०१ धावा केल्या. अनुज रावतनेही ( २३) विराटसह ६४ धावा जोडल्या. RCB ने ५ षटकांत १९७ धावा केल्या.
मोहम्मद सिराजने तिसऱ्या षटकात वृद्धीमान साहाला बाद केले. वेन पार्नेलने एका हाताने अफलातून झेल घेत साहाला ( १२) माघारी पाठवले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या विजय शंकरने दुसऱ्या विकेटसाठी शुबमन गिलसोबत महत्त्वाची भागीदारी केली. शुबमनने २९ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे आणि एकूण १९वे अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या पर्वात ६००+ धावा करणाराही तो चौथा ( फॅफ, विराट, यशस्वी जैस्वाल) फलंदाज ठरला. शुबमनने १३व्या षटकात ब्रेसवेलचे दोन षटकाराने स्वागत केले आणि त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. विजय शंकर ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा करताना शुबमनसह १२३ धावांची ( ७१ चेंडू) महत्त्वपूर्ण भागीदारी करून माघारी परतला. ( विजय शंकरने स्टेडियमच्या छतावर पोहोचवला चेंडू )
विराट कोहलीने सातवे शतक ठोकले, अनुष्काने बेभान सेलिब्रेशन केले; Video Viral
अनेकांना वाटतं माझं ट्वेंटी-२० क्रिकेट संपलं, पण...! शतकानंतर विराट कोहलीनं टीकाकारांना झोडलं
गुजरातला ३० चेंडूंत ५० धावाच करायच्या होत्या. पण, हर्षल पटेलने GT ला आणखी एक धक्का देताना दासून शनाकाला ( ०) झेलबाद केले. २४ चेंडूंत ४३ धावा GT ला हव्या होत्या आणि RCBचा संघ दडपणाखाली गेलेला दिसला. शुबमनने १८व्या षटकात मोहम्मद सिराजचा चेंडू सीमापार भिरकावला अन् बंगलुरूत सन्नाटा पोहोचवला. आयपीएलच्या एका पर्वातील १०६३ वा षटकार ठरला अन् ही सर्वोत्तम संख्या ठरली. २०२२ मध्ये १०६२ षटकार आले होते. पण, दुसऱ्या बाजूला डेव्हिड मिरलची ( ६) विकेट पडली. शुबमन चांगले फटके मारत होता आणि त्यामुळे RCBच्या गोलंदाजांवर दबाव जाणवू लागले.
६ चेंडूंत ८ धावा हव्या असताना पार्नेलने पहिला चेंडू फुलटॉस नो बॉल टाकला आणि शुबमनला फ्री हिट मिळाला. पार्नेलने पुन्हा वाईड चेंडू टाकून अशाच दोन धावा दिल्या. शुबमने षटकार मारून GTचा विजय पक्का केला अन् शतकही पूर्ण केले. त्याने ५२ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह १०४ धावा केल्या. गुजरातने १९.१ षटकांत ४ बाद १९८ धावा केल्या.