IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला घरच्या मैदानावर अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे भाग आहे. पावसामुळे नाणेफेक ७.४५ वाजता झाली. मुंबईने जरी विजय मिळवला असला तरी त्यांचा नेट रन रेट हा -०.०४४ असा आहे, उलट RCBचा ०.१८० असा आहे. पाऊस थांबला आणि RCB ने विजय मिळवला तर मुंबई स्पर्धेबाहेर होतील. मुंबईच्या विजयाने मात्र राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले.
GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा पाऊस सुरू झाल्याने २५ मिनिटे विलंब झाला. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांचा फॉर्म हा RCBसाठी यंदाच्या पर्वात जमेची बाब ठऱली आहे. या दोघांनी तिसऱ्या षटकानंतर गिअर बदलला. मोहम्मद शमीच्या षटकात फॅफने चार चौकार खेचले अन् त्यानंतर विराटने चौथ्या षटकात यश दयालला सलग तीन चौकार खेचले. फॅफ-विराट जोडी आज कोणत्याच गोलंदाजाला सोडत नव्हते. राशीद खानचेही स्वागत विराटने चौकाराने केले आणि ६ षटकांत त्यांनी ६२ धावा उभ्या केल्या. या दोघांची ही आठवी ५०+ धावांची भागीदारी आहे आणि यंदाच्या पर्वातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.
मुंबई इंडियन्सला 'चौथी' सीट? कॅमेरून ग्रीनचे शतक अन् SRHवर दणदणीत विजय, पण...
आठव्या षटकात नूर अहमदने RCBला पहिला धक्का दिला. फॅफ ( २८) स्टम्प सोडून फटका मारायला गेला अन् चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक वृद्धीमान साहाच्या पॅडवर आदळून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या राहुल तेवातियाच्या हाती विसावला. विराट आणि फॅफ यांनी यंदाच्या पर्वात ९३९ धावांची भागीदारी केली आहे आणि २०१६ मध्ये विराट व एबी डिव्हिलियर्स यांच्या सर्वाधिक ९३९ धावांच्या विक्रमाशी आज बरोबरी झाली. पुढच्या षटकात राशीद खानने RCBची दुसरी विकेट घेताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ११) दांडा उडवला. नूरने त्याच्या पुढच्या षटकात महिपाल लोमरोरला ( १) माघारी पाठवले. साहाने अप्रतिम स्टम्पिंग केला.
Web Title: IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Virat Kohli, Faf du Plessis Creates History, Most runs scored by a pair in an IPL season in history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.