Jason Roy Fined, IPL 2023 RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला चांगली लय मिळालेली असताना, बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला. तब्बल १७ दिवसांच्या नंतर KKR ला विजय मिळाला. या सामन्याचा मानकरी ठरला इंग्लंडला जेसन रॉय. पण विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध धुमाकूळ घालणारा कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर जेसन रॉय याला शिक्षा झाली. IPL 2023 च्या 36 व्या सामन्यात रॉयने 29 चेंडूत 56 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने एकाच षटकात 4 षटकार मारले. इतकी चांगली खेळी करूनही त्याच्या खेळीला गैरवर्तणुकीचे गालबोट लागले.
केकेआरचा 8 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे, तर बंगळुरूचा 8 सामन्यांमधला चौथा पराभव आहे. इंग्लिश फलंदाज रॉयने शाहबाज अहमदच्या षटकात 4 षटकार ठोकत कोलकात्याला पुन्हा एकदा विजयपथावर आणले. मात्र, केकेआरच्या विजयानंतर त्याला शिक्षाही झाली. त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आयपीएलच्या नियमावलीचा भंग केल्याबद्दल मोडल्याबद्दल रॉय दोषी आढळला आणि त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. त्याने आयपीएल आचारसंहितेच्या 2.2 च्या लेव्हल 1 चा गुन्हा देखील स्वीकारला. रॉयला बाद झाल्यानंतर केलेल्या गैरवर्तनासाठी शिक्षा झाली.
---
बाद झाल्यावर राग अनावर, मग बसला दंड
10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजयकुमार वैशाखने रॉयला बोल्ड केले, त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना रॉयने आपला राग दाखवत बॅट हवेत फेकली. त्यांच्या या वागण्यावर बरीच टीकाही झाली होती. त्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोलकाताचे दमदार पुनरागमन
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना रॉयचे अर्धशतक आणि कर्णधार नितीश राणाच्या 48 धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूला 8 विकेट्सवर 179 धावाच करता आल्या. फलंदाजां पाठोपाठ केकेआरच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने 3 तर सुयश शर्मा आणि आंद्रे रसेलने 2-2 बळी घेतले. बंगलोरकडून विराट कोहलीने अर्धशतक ठोकले पण त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने RCBच्या पदरी पराभवच आला.