IPL 2023, RCB vs KKR Live : जेसन रॉयची फटकेबाजी, RCBच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण; KKR ने उभा केला धावांचा डोंगर

IPL 2023, RCB vs KKR Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकाही KKRच्या पथ्यावर पडल्या. कर्णधार नितीश राणाचे तीन सोपे झेल RCBच्या खेळाडूंनी रापले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:10 PM2023-04-26T21:10:53+5:302023-04-26T21:14:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs KKR Live : Jason Roy scored 56 in 29 balls, poor fielding by RCB players; KKR put 201 target | IPL 2023, RCB vs KKR Live : जेसन रॉयची फटकेबाजी, RCBच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण; KKR ने उभा केला धावांचा डोंगर

IPL 2023, RCB vs KKR Live : जेसन रॉयची फटकेबाजी, RCBच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण; KKR ने उभा केला धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपडणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सना जेसन रॉय व एन जगदीशन यांनी चांगली सुरुवात करून दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकाही KKRच्या पथ्यावर पडल्या. कर्णधार नितीश राणाचे तीन सोपे झेल RCBच्या खेळाडूंनी रापले. याचा पुरेपूर फायदा नितीशने उचलताना २० चेंडूंत ४८ धावा चोपल्या. वनिंदू हसरंगाने १८व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत RCBला पुनरागमन करून दिले. तरीही KKRने चांगले लक्ष्य उभे केले. 

जेसन रॉयने ६ चेंडूंत २८ धावा कुटल्या, DRS विरोधात गेल्यानंतर विराट-अनुष्काचा चेहरा बघा कसा झाला


जेसन व एन जगदीशन यांनी पॉवर प्लेमध्ये ६६ धावा कुटल्या. जेसनने सहाव्या षटकात शाहबाज अहमदला चार खणखणीत षटकार खेचले. जेसनने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वैशाख विजय कुमारच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात जगदीशन ( २७ ) झेलबाद झाला. KKRला ८३ धावांवर पहिला धक्का बसला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वैशाखने जेसनचा त्रिफळा उडवला. जेसन २९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावांवर बाद झाला. जेसनने KKRला चांगला सेटअप उभा करून दिला. वैशाखच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने KKRचा कर्णधार नितीश राणाचा सोपा झेल सोडला. ( जेसन रॉयची विकेट पाहा )

 

नितीशला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आणि यावेळेस सिराजच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलने हा झेल टाकला. नितीशला जीवदान देणे RCBला महागात पडले. त्याने १६व्या षटकात २ उत्तुंग षटकार खेचले अन् संघाची धावसंख्या १५० पर्यंत नेली. वैशाखच्या चौथ्या षटकात नितीशने १७ धावांचा पाऊस पाडला. वैशाखने ४-०-४१-२ अशी स्पेल फेकली. वनिंदूने RCBला मोठी विकेट मिळवून दिली. नितीश २१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर वैशाखच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्याच षटकात दुसरा सेट फलंदाज वेंकटेश अय्यर ( ३१) बाद झाला. वनिंदूने २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. KKR ने ५ बाद २०० धावा केल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs KKR Live : Jason Roy scored 56 in 29 balls, poor fielding by RCB players; KKR put 201 target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.