IPL 2023, RCB vs KKR Live : विराट बाद झाला, कार्तिकने सहकाऱ्याला Run Out केला; RCB ने पराभव ओढावून घेतला

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने तिसऱ्या विजयाची नोंद करताना प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:09 PM2023-04-26T23:09:37+5:302023-04-26T23:15:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs KKR Live Marathi : Kolkata Knight Riders beat RCB by 21 runs in this IPL 2023. | IPL 2023, RCB vs KKR Live : विराट बाद झाला, कार्तिकने सहकाऱ्याला Run Out केला; RCB ने पराभव ओढावून घेतला

IPL 2023, RCB vs KKR Live : विराट बाद झाला, कार्तिकने सहकाऱ्याला Run Out केला; RCB ने पराभव ओढावून घेतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने पॉवर प्लेमध्येच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ताकद हिरावून घेतली. विराट कोहली व महिपाल लोम्रोर यांनी RCBसाठी खिंड लढवताना विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण, सेट फलंदाज मागोमाग बाद झाले, त्यात दिनेश कार्तिकने सहकाऱ्याला रन आऊट केले आणि RCBच्या चाहत्यांमध्ये टेंशन निर्माण झाले. वेंकटेश अय्यरने घेतलेला विराटचा अफलातून झेल मॅचला कलाटणी देणारा ठरला. कोलकाताचा हा तिसरा विजय ठरला. 

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; RCBचा गडगडलेला डाव सावरला अन् अनुष्काचा चेहरा खुलला


मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फॅफ ड्यू प्लेसिस ७ चेंडूंत १७ धावांवर बाद झाला. सुयश शर्माने फॅफसह शाहबाद अहमद (२) चीही विकेट घेतली. वरुण चक्रवर्थीच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल ( ४) झेलबाद झाला. विराट कोहली व महिपाल लोम्रोर यांनी RCBच्या डावाला आकार दिला. विराटने ३३ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे अर्धशतक झळकावले. विराट व लोम्रोर यांची ५५ धावांची भागीदारी चक्रवर्थीने संपुष्टात आणली. लोम्रोर १८ चेंडूंत ३४ धावांवर बाद झाला.  १३व्या षटकात वेंकटेश अय्यरने अफलातून झेल घेत विराटवादळ रोखले. रसेलच्या गोलंदाजीवर विराट ५४ धावांवर ( ३७) बाद झाला.  ( वेंकटेश अय्यरने घेतलेला अप्रतिम झेल पाहा


दिनेश कार्तिक व सुयश प्रभुदेसाई यांच्यावर पूर्ण मदार होती. पण दिनेशचा अतिउत्साह महागात पडला अन् १० धावांवर प्रभुदेसाई रन आऊट झाला. RCBला ३० चेंडूंत ६३ धावा हव्या होत्या. दिनेश ४०वेळा रन आऊटमध्ये सहभागी झाला आणि ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. यापैकी २७वेळा त्याने सहकाऱ्याला बाद केलेय, तर १३ वेळा स्वतः बाद झालाय.  २४ चेंडू ५६ धावा अशी मॅच आली होती. दिनेशने १७व्या षटकात रसेलचा चेंडू सीमापार पाठवला. वनिंदूला (५) माघारी पाठवून रसेलने वचपा काढला. वरूणनने सामन्यातील तिसरी विकेट घेताना दिनेशला ( २२) माघारी पाठवले.  ६ चेंडूंत ३५ धावांची गरज होती, परंतु RCBकडे तसा तगडा फलंदाज नव्हता. डेव्हिड विली आणि वैशाख ही जोडी खेळपट्टीवर होती. बंगळुरूला ८ बाद १७९ धावा करता आल्या आणि कोलकाताने २१ धावांनी सामना जिंकला. 

तत्पूर्वी, जेसन रॉय व एन जगदीशन ( २७) यांनी ८३ धावांची भागीदारी केली. जेसनने २९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावा केल्या. नितीश राणाने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलताना २० चेंडूंत ४८ धावा चोपल्या. वेंकटेश अय्यर ३१ धावांवर बाद झाला. रिंकू सिंग ( १८*) आणि डेव्हिड विसे ( १२*) यांनी शेवटच्या षटकात चांगले फटके मारताना KKRला ५ बाद २०० धावा उभारून दिल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs KKR Live Marathi : Kolkata Knight Riders beat RCB by 21 runs in this IPL 2023.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.