Join us  

IPL 2023, RCB vs KKR Live : 4,6,6,6,0,6! जेसन रॉयने ६ चेंडूंत २८ धावा कुटल्या, DRS विरोधात गेल्यानंतर विराट-अनुष्काचा चेहरा बघा कसा झाला

कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) प्रवास काही चांगला झालेला दिसत नाही आणि दुसऱ्या हाफमध्ये त्यांचे पुनरागमनाचे प्रयत्न आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 8:09 PM

Open in App

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा पहिला टप्पा पार झाला आहे आणि चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स यांनी तालिकेत १० गुणांसह आघाडी घेतलीय. कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) प्रवास काही चांगला झालेला दिसत नाही आणि दुसऱ्या हाफमध्ये त्यांचे पुनरागमनाचे प्रयत्न आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ( RCB) आज त्यांचा सामना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB ने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केलीय आणि आज त्यांचा हॅटट्रिकचा प्रयत्न आहे. 

या दोन संघांमधील पहिल्या लढतीत शार्दूल ठाकूरने खणखणीत अर्धशतक झळकावून RCBला पराभूत केले होते आणि आता त्याची परतफेड घरच्या मैदानावर करण्यासाठी विराटसेना सज्ज आहे. पण, आजच्या सामन्यात शार्दूल दुखापतीमुळे खेळत नसल्याचे अपडेट्स समालोचक रॉबिन उथप्पा याने दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ७ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवणाऱ्या KKRसाठी पुढील प्रत्येक सामना जिंकावा  लागणार आहे. त्यामुळे जेसन रॉयला आज सलामीला पाठवले गेले आणि त्याने पहिल्या षटकात दोन चौकार मारून अपेक्षित सुरुवात करून दिली. 

जेसन व एन जगदीशन यांनी पॉवर प्लेमध्ये ६६ धावा कुटल्या. जेसनने सहाव्या षटकात शाहबाज अहमदला चार खणखणीत षटकार खेचले. यंदाच्या आयपीएलमधील KKRची ही पहिल्या विकेटसाठीची पहिलीच अर्धशतकी भागीदारी आहे. वनिंदू हसरंगाने टाकलेल्या पाचव्या षटकात रॉयसाठी LBW ची जोरदार अपील झाली. मैदानावरील अम्पायरने नाबाद देताच विराटने DRS घेतला अन् स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्माची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण, रिप्लेमध्ये चेंडू स्टम्प मिस करताना दिसला अन् विराट व अनुष्काची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. जेसनने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स
Open in App