IPL 2023, RCB vs KKR Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; RCBचा गडगडलेला डाव सावरला अन् अनुष्काचा चेहरा खुलला

पॉवर प्लेमध्ये RCBचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) चांगला खेळ केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:32 PM2023-04-26T22:32:07+5:302023-04-26T22:32:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs KKR Live Marathi : Virat Kohli completes 3,000 runs at the Chinnaswamy Stadium in T20 cricket, registered world record | IPL 2023, RCB vs KKR Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; RCBचा गडगडलेला डाव सावरला अन् अनुष्काचा चेहरा खुलला

IPL 2023, RCB vs KKR Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; RCBचा गडगडलेला डाव सावरला अन् अनुष्काचा चेहरा खुलला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सच्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव गडगडला. पॉवर प्लेमध्ये RCBचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) चांगला खेळ केला. आयपीएल २०२३मधले पाचवे अर्धशतक त्याने झळकावले आणि ३००+ धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासह विराटने आज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आणि हे पाहून अनुष्का शर्माच्या गालावरची कळी फुलली. 

जेसन रॉय व एन जगदीशन ( २७) यांनी ८३ धावांची भागीदारी केली. RCBच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका KKRच्या पथ्यावर पडल्या. कर्णधार नितीश राणाचे ३ सोपे झेल RCBच्या खेळाडूंनी रापले. याचा पुरेपूर फायदा नितीशने उचलताना २० चेंडूंत ४८ धावा चोपल्या. वनिंदू हसरंगाने १८व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत RCBला पुनरागमन करून दिले. तरीही KKRने चांगले लक्ष्य उभे केले.   जेसन २९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावांवर बाद झाला. वैशाख विजयकुमारने ४-०-४१-२ अशी स्पेल फेकली. वनिंदूने २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेंकटेश अय्यर ३१ धावांवर बाद झाला. रिंकू सिंग ( १८*) आणि डेव्हिड विसे ( १२*) यांनी शेवटच्या षटकात चांगले फटके मारताना KKRला ५ बाद २०० धावा उभारून दिल्या.


फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी पुन्हा एकदा स्फोटक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या दोन षटकांत ३० धावा चोपल्या. KKR ने तिसऱ्या षटकात सुयश शर्माला गोलंदाजीला आणलं आणि त्याने फॅफला १७ ( ७ चेंडू) धावांवर झेलबाद केले. सुयशच्या पुढच्या षटकात विराटने दोन खणखणीत चौकार खेचले, परंतु त्या षटकात शाहबाज अहमदने ( २) विकेट फेकली. वरुण चक्रवर्थीने पुढच्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला ( ४) चूक करण्यास भाग पाडले आणि RCB चे तीन फलंदाज पॉवर प्लेमध्ये ५८ धावांत माघारी परतले. KKRच्या फिरकी गोलंदाजांचा मारा अप्रतिम सुरू होता आणि विराटवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या.


KKR ने अनुभवी फिरकीपटू सुनील नरीनला गोलंदाजीला आणले, परंतु महिपाल लोम्रोरने दोन षटकार खेचून त्याचे स्वागत केले. विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर ट्वेंटी-२०तील ३००० धावा पूर्ण केल्या. त्याने मुशफिकर रहिमचा ( २९८९ - मिरपूर) विक्रम मोडला. विराटने ३३ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे अर्धशतक झळकावले. विराट व लोम्रोर यांची ५५ धावांची भागीदारी चक्रवर्थीने संपुष्टात आणली. लोम्रोर १८ चेंडूंत ३४ धावांवर बाद झाला.  १३व्या षटकात वेंकटेश अय्यरने अफलातून झेल घेत विराटवादळ रोखले. रसेलच्या गोलंदाजीवर विराट ५४ धावांवर ( ३७) बाद झाला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs KKR Live Marathi : Virat Kohli completes 3,000 runs at the Chinnaswamy Stadium in T20 cricket, registered world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.