IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा

IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli)ने पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार खेळ केला. फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनीही धू धू धुतले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 09:19 PM2023-04-10T21:19:42+5:302023-04-10T21:20:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs LSG Live : Virat Kohli, Faf du Plessis & Glenn Maxwell scored fifty;  RCB close their allotted 20 overs on 212/2 | IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा

IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore Vs Lucknow Super Giants Team Live : विराट कोहली ( Virat Kohli)ने पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर दमदार खेळ केला. त्याने आज ६१ धावांची स्फोटक खेळी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ९६ धावांची सलामी मिळवून दिली. लखनौ सुपर जायंट्सच्या फिरकीपटूंनी RCBच्या धावांची गती मंदावली होती, परंतु कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांचे वादळ घोंगावले. फॅफने आयपीएल २०२३ मध्ये सर्वात लांब ११५ मीटर षटकार खेचून चेंडू स्टेडियमच्या छतावर पोहोचवला. 

विराट कोहलीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला टाकले मागे


लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी चांगली सुरूवात करून दिली.  विराटने चांगले फटके मारले. रवी बिश्नोईने RCBच्या स्टार फलंदाजाला हैराण केले होते. फिरकी गोलंदाज आल्याने विराटचा खेळ थोडासा मंदावला. त्याने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटने आयपीएलमध्ये ४६ अर्धशतकं आणि ५ शतकं झळकावली आहेत. ४१ वर्षीय अमित मिश्राने RCB ला धक्का दिला. विराट ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून ६१ धावांवर बाद झाला. 


विराटने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत चौथे स्थान पटकावताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचला मागे टाकले. विराटनंतर कर्णधार फॅफ व ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी केली. RCB ने १५ षटकांत १ बाद १३७ धावा केल्या. स्पिनर्सची धुलाई झाल्यानंतर KL Rahul ने पुन्हा मार्क वूडला गोलंदाजीला आणले. फॅफने त्यालाही षटकार खेचून ३५ चेंडूंत आयपीएलमधील २७वे अर्धशतक पूर्ण केले. फॅफ व मॅस्कवेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण करताना RCBला पुन्हा रूळावर आणले. कृणालने ३९ धावांवर मॅक्सवेलचा झेल टाकला. 


मॅक्सवेलनेही २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आवेश खानला त्याने सलग दोन खणखणीत षटकार खेचून पन्नास धावा पूर्ण केल्या. फॅफ व मॅक्सवेल यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना ४३ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. मार्क वूडच्या शेवटच्या षटकात RCB ने ९ धावा केल्या आणि LSG समोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. फॅफ ४६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला, तर मॅक्सवेल २९ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ५९ धावांवर बाद झाला. RCB ने २ बाद २१२ धावा केल्या. 
 

Web Title: IPL 2023, RCB vs LSG Live : Virat Kohli, Faf du Plessis & Glenn Maxwell scored fifty;  RCB close their allotted 20 overs on 212/2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.