Join us  

IPL 2023, RCB Vs LSG: मैदानातील वादानंतर ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं?; आरसीबीने शेअर केला व्हिडिओ

IPL 2023, RCB Vs LSG: आरसीबीच्या या विजयानंतर त्यांनी संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ड्रेसिंगरुममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

By मुकेश चव्हाण | Published: May 02, 2023 10:22 AM

Open in App

फलंदाज अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून मारा करत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (आरसीबी) मर्यादित धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करुन दिले आणि लखनौ सुपरजायंट्सचे कडवे आव्हान १८ धावांनी परतावले. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ९ बाद १२६ धावा केल्यानंतर आरसीबीने लखनौला १९.५ षटकांत १०८ धावांमध्ये गुंडाळले. 

कोहली, गंभीर अन् नवीन उल हक; तिघांनाही IPLचा दणका, १ कोटी ३३ लाख ७९ हजार गमावले!

आरसीबीच्या गोलंदाजांनी सांधिक कामगिरी केली. लखनौचा अर्धा संघ केवळ ३८ धावांमध्येच बाद करत आरसीबीने सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मात्र, मार्कस स्टोइनिस आणि कृष्णप्पा गौतम यांनी सहाव्या गड्यासाठी २२ चेंडूंत २७ धावांची भागीदारी करत लखनौच्या आशा कायम राखल्या. अकराव्या षटकात कर्ण शर्माने स्टोइनिसला झेलबाद केल्यानंतर गौतम पुढच्या षटकात धावबाद झाला. क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने लोकेश राहुल दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्याला तीन चेंडू खेळून एकही धाव काढता आली नाही आणि आरसीबीचा १८ धावांनी विजय झाला. 

विराट कोहलीला नडणारा नवीन उल हक कोण?; शाहिद आफ्रिदीसोबतही असाच भांडला होता...

आरसीबीच्या या विजयानंतर त्यांनी संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ड्रेसिंगरुममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. तर आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिसने संघासाठी केलेली महत्वाची भागीदारी आणि विराट कोहलची आक्रमकत संघाला किती मदत करते, याबाबत भाष्य केले. यासोबत कर्ण शर्मा आणि जोश हेझलवूड आपल्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली. 

आरसीबी आणि लखनौचा सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादामुळे गाजला. लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ विरोधात विराट कोहली फिल्डिंग करताना उत्साहित दिसला. प्रत्येक सामन्यानंतर जणू बेंगलोरमधील पराभवाचा वचपा काढत होता. विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२३
Open in App