Join us  

IPL 2023 : ९२ वर्षांच्या आजींनी नाही चुकवली विराट कोहलीची अविस्मरणीत फटकेबाजी; पाहा ४.११ मिनिटांचा जबरा Video

IPL 2023 RCB vs MI : विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी काल चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 4:54 PM

Open in App

IPL 2023 RCB vs MI : विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी काल चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७२ धावांचे आव्हान होते आणि या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करून MI ला हतबल केले. २०१८नंतर प्रथमच आयपीएल पुन्हा एकदा होम-अवे फॉरमॅटमध्ये होत असल्याने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर तौबा गर्दी झाली होती. RCBचे आणि खास करून विराट कोहलीचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विराटने त्यांच्यासाठी पैसावसूल खेळी केली. विराटच्या चाहतावर्गात लहानांपासून वृद्धांचाही समावेश आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती मिळाली. ९२ वर्षांच्या आजींनी विराटची अविस्मरणीय खेळी नाही चुकवली.  विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी आक्रमक सुरूवात केली. फॅफने २९ चेंडूंत आयपीएलमधील २६वे अर्धशतक पूर्ण केले. विराटनेही सुरेख फटकेबाजी करून आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ३००० धावांचा टप्पा ओलांडला. विराटने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे हे आयपीएलमधील ४५ वे अर्धशतक ठरले.  फॅफ ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार केचून ७३ धावांवर माघारी परतला. विराटने ४९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ८२ धावा करताना RCBचा ८ विकेट्स व २२ चेंडू राखून विजय पक्का केला. तत्पूर्वी, इशान किशन ( १०), कॅमेरून ग्रीन ( ५), रोहित शर्मा ( १) व सूर्यकुमार यादव ( १५) हे चार फलंदाज ४८ धावांत माघारी परतल्याने मुंबई इंडियन्स अडचणीत सापडले होते. पण, तिलक वर्मा आणि नेहाल वडेरा या युवा खेळाडूंची पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करून गाडी रुळावर आणली. वडेरा २१ धावांवर झेलबाद झाला. टीम डेव्हिड ( ४) अपयशी ठरला, परंतु तिलक खिंड लढवत राहिला. त्याने ४६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकाराने नाबाद ८४ धावा चोपल्या. मुंबईने २० षटकात ७ बाद १७१ धावा केल्या. अर्शद खानने ९ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. कर्ण शर्माने दोन विकेट्स घेतल्या.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सऑफ द फिल्ड
Open in App