IPL 2023, Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पॉवर प्ले मध्येच दम दाखवला. पण, तिलक वर्मा ( Tilak Verma) RCBच्या गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला अन् संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. RCBलाही एक धक्का बसला रिसे टॉपली याला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली.
काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं...
मोहम्मद सिराजने तिसऱ्या षटकात इशान किशनला ( १०) चतुराईने झेलबाद केले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन ( ५)चा रिसे टॉपलीने त्रिफळा उडवला. जीवदान मिळूनही रोहित शर्माला ( १) मोठी खेळी करता आली नाही. आकाश दीपने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ८व्या षटकात टॉपलीच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. RCBसाठी हा मोठा धक्का होता. मायकेल ब्रेसवेलने फिरकीवर सूर्यकुमार यादवची ( १५) विकेट घेत मुंबईला चौथा धक्का दिला. पण, तिलक वर्मा आणि नेहाल वडेरा या युवा खेळाडूंची चांगली फटकेबाजी केली. कर्ण शर्माच्या षटकात वडेराने दोन खणखणीत षटकार खेचले आणि एक चेंडू स्टेडियमबाहेर पाठवला. पण, पुढच्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वडेरा ( २१) झेलबाद झाला. त्याने तिलकसह ३१ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली.
तिलक व टीम डेव्हिड यांच्याकडून अखेरच्या ६ षटकांत चांगल्या खेळीची अपेक्षा होती, परंतु कर्ण शर्माने MI ला जबरदस्त धक्का दिला. डेव्हिड ( ४) धावांवर त्रिफळाचीत झाला. शर्माने ३२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तिलकने षटकाराने अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने १८व्या षटकात अफलातून झेल घेतला अन् हृतिक शोकीनला ( ५) मैदानाबाहेर जावे लागले. सिराजने १९व्या षटकात सलग चार Wideसह पाच अतिरिक्त धावा दिल्या आणि त्या षटकात १६ धावा आल्या. तिलकने अखेपर्यंत खिंड लढवताना ४६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकाराने नाबाद ८४ धावा चोपल्या. अर्शद खाननेही अखेरच्या षटकात चांगली साथ देताना १५ धावा केल्या. मुंबईने २० षटकात ७ बाद १७१ धावा केल्या.
Web Title: IPL 2023, RCB vs MI Live : 20-year old Tilak Verma scored 84*(46) with 9 fours & 4 sixes against RCB in tough situation, Mumbai Indians score 171/7
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.