रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने घरच्या मैदानावर खेळताना बलाढ्य मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्स राखत पराभव करत यंदाच्या आयपीएलमध्ये दणदणीत विजयी सलामी दिली. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आरसीबीने कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली. मुंबईची आयपीएलमध्ये सलग अकराव्यांदा पराभवाने सुरुवात झाली.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केलेल्या आरसीबीने मुंबईला २० घटकांत ७ बाद १७१ धावांवर रोखले. हे आव्हान आरसीबीने १६.२ षटकांतच पार करताना २ बाद १७२ धावा केल्या. डुप्लेसिसने ४३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावा केल्या. कोहलीने ४९ चेंडूंत नाबाद ८२ धावा फटकावताना ६ चौकार व ४ षटकार मारले. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवर कोहलीचा झेल सोडला. डुप्लेसिस- कोहली यांनी ८९ चेंडूत १४३ धावांची जबरदस्त सलामी देत निकाल स्पष्ट केला. या सामन्याचा डुप्लेसिस सामनावीर ठरला.
'वडापाव..वडापाव...'; Live सामन्यात RCBच्या चाहत्यांनी रोहित शर्माला डिवचले, पाहा Video
सामना जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने एक आर्श्चयचकित करणारा दावा केला आहे. ड्युप्लेसिस म्हणाला की, मला सामन्यातील अखेरची षटके शिल्लक असताना जाणूनबुजून बाद व्हायचे होते. मी खूप थकलो होतो. क्रीजवर उभं राहण्यास देखील मला जमत नव्हतं. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की मी बाद होतो. त्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी येईल. कारण माझ्यामुळे संघाच्या धावांवर काही परिणाम पडायला नको, असं ड्युप्लेसिसने सांगितले. मी रिटायर्ड हर्ट होण्याचा देखील विचार केला. परंतु दुसऱ्या बाजूने विकेट्स पडली. त्यामुळे मी बाद होण्याचा आणि रिटायर्ड होण्याचा निर्णय बदलला, असं ड्युप्लेसिस म्हणाला.