IPL 2023, RCB vs PBKS Live : विराटचे अचूक DRS, सिराजचा भेदक मारा! RCB ने मिळवला पंजाब किंग्सवर दणदणीत विजय

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:05 PM2023-04-20T19:05:41+5:302023-04-20T19:06:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs PBKS Live : Mohammed Siraj took 4 wickets, Royal Challengers Bangalore Won by 24 Run | IPL 2023, RCB vs PBKS Live : विराटचे अचूक DRS, सिराजचा भेदक मारा! RCB ने मिळवला पंजाब किंग्सवर दणदणीत विजय

IPL 2023, RCB vs PBKS Live : विराटचे अचूक DRS, सिराजचा भेदक मारा! RCB ने मिळवला पंजाब किंग्सवर दणदणीत विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली होती. विराट कोहलीने ( Virat Kohli) दोन अचूक DRS घेतले, मोहम्मद सिराजने धक्के दिले अन् क्षेत्ररक्षणात भन्नाट रन आऊटही केला. त्यात फिरकीपटू वनिंदू हसरंगानेही प्रभावी कामगिरी केली. जितेश शर्मा व हरप्रीत ब्रार यांनी पंजाबसाठी खिंड लढवली, परंतु पुन्हा एकदा सिराजने मॅच फिरवली. त्याने १८व्या षटकात दोन विकेट्स घेऊन RCBचा विजय पक्का केला. 

आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video


मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात अथर्व तायडे ( ४) ला LBW केले. मॅथ्यू शॉर्ट ८ धावांवर त्रिफळाचीत झाला. लाएम लिव्हिंगस्टोनही (२) सिराजच्या गोलंदाजीवर LBW झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिराजला मिळालेल्या दोन्ही विकेट हा DRS मुळे यशस्वी ठरल्या. गोलंदाजीतच नव्हे, तर सिराजने क्षेत्ररक्षणातही कमाल केली आणि हरप्रीत सिंगला ( १३) डायरेक्ट थ्रोवर रन आऊट केले. कर्णधार सॅम करन व प्रभसिमरन सिंग यांनी ३३ धावा जोडताना पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, करनला अतिआत्मविश्वास नडला. विजय कुमार वैशाच्या षटकात चौकार खेचल्यानंतर एक धाव घेण्याची घाई त्याने केली आणि तो आरामात पळताना दिसला. वनिंदूने अचूक थ्रो करून करनला ( १०) रन आऊट केला. पंजाबचा निम्मा संघ ७६ धावांत माघारी परतला.


प्रभसिमरन पंजाब किंग्ससाठी आशेचा किरण बनला होता. त्याने चार उत्तुंग षटकार व ३ खणखणीत चौकार खेचून RCBच्या गोटात चिंता निर्माण केली होती. १२व्या षटकात वेन पार्नेलचा चेंडू त्याने वावराबाहेर भिरकावला, परंतु पुढच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. प्रभसिमरन ३० चेंडूंत ४६ धावांवर त्रिफळाचीत झाला. शाहरूख खान मॅच फिनिश करेल असे वाटले होते, परंतु वनिंदूने फिरकीवर त्याला नाचवले. दीनेश कार्तिकने सुरेख स्टम्पिंग केली. २४ चेंडूंत ३७ असे शक्य लक्ष्य पंजाबसमोर होते, परंतु त्यांचे ७ फलंदाज माघारी परतले होते. हरप्रीत ब्रार व जितेश शर्मा हीच अखेरची आशा PBKSला होती. हर्षल पटेलने १७व्या षटकात ७ धावा दिल्या. विराटने जितेशला झेल टाकला.


१८व्या षटकात सिराजने PBKS च्या ब्रारची ( १२) दांडी उडवली अन् मॅच फिरवली. १३ चेंडूंत २६ अशी मॅच होती आणि पंजाबची सर्व भिस्त जितेशवर होती. त्याच षटकात सिराजने नॅथन एलिसचा त्रिफळा उडवला. हर्षल पटेलने अखेरची विकेट घेताना जितेशला ४१ धावांवर ( २७ चेंडू) माघारी पाठवले. पंजाबचा संपूर्ण संघ १५० धावांवर तंबूत परतला अन् बंगळुरूने २४ धावांनी सामना जिंकला.  

तत्पूर्वी, मोहालीत फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांचे वादळ घोंगावले. या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली आणि मोहालीवरील RCBकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. विराट ४७ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल ( गोल्डन डक) बाद झाला. फॅफ  ५६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ८४ धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिक ( ७) आजही फेल गेला. RCB ला ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs PBKS Live : Mohammed Siraj took 4 wickets, Royal Challengers Bangalore Won by 24 Run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.