IPL 2023, RCB vs PBKS Live : आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:07 PM2023-04-20T18:07:34+5:302023-04-20T18:08:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli's reaction after that successful DRS, Mohammad Siraj gets his 2nd wicket now, Faf Du Plessis appreciating, What a run-out by Mohammad SirajVideo  | IPL 2023, RCB vs PBKS Live : आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video

IPL 2023, RCB vs PBKS Live : आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली आहे. १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना PBKSचे ४ फलंदाज पॉवर प्लेमध्येच माघारी परतले आहे. विराट कोहली आजच्या सामन्यात RCBचे नेतृत्व करतोय आणि त्याची आक्रमकता संपूर्ण संघात दिसतेय. विराटने आज कर्णधार म्हणून आश्चर्य करणारे निर्णय घेतले आणि त्याचा फायदा मोहम्मद सिराजला झालेला पाहायला मिळाला. 

मारला पॅडल स्वीप, झाला झेलबाद! जितेशने घेतलेल्या अफलातून कॅचवर विराटला बसेना विश्वास, Video  

मोहालीत आज फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांचे वादळ घोंगावले. पहिल्या १० षटकांत या दोघांनी ९१ धावा चोपलेल्या, परंतु पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगले पुनरागमन केले. या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली आणि मोहालीवरील RCBकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. विराट ४७ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल ( गोल्डन डक) बाद झाला. फॅफ  ५६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ८४ धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिक ( ७) आजही फेल गेला. RCB ला ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले.


मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात अथर्व तायडे ( ४) ला LBW करून पंजाबला धक्का दिला. मॅथ्यू शॉर्ट चांगले फटके मारत होता आणि त्याला तिसऱ्या षटकात वनिंदू हसरंगाने गप्प केले. शॉर्ट ८ धावांवर त्रिफळाचीत झाला. लाएम लिव्हिंगस्टोनही (२) सिराजच्या गोलंदाजीवर LBW झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिराजला मिळालेल्या दोन्ही विकेट हा DRS मुळे यशस्वी ठरल्या. मैदानावरील अम्पायरने फलंदाजांना नाबाद दिले होते आणि विराटने योग्य DRS घेतले. सिराजने क्षेत्ररक्षणातही कमाल केली आणि हरप्रीत सिंगला ( १३) डायरेक्ट थ्रोवर रन आऊट केले. पंजाबने ४३ धावांत ४ फलंदाज गमावले. DRS यशस्वी ठरल्याने विराटला स्वतःचचं आश्चर्य वाटलं आणि तो भलताच आनंदी झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli's reaction after that successful DRS, Mohammad Siraj gets his 2nd wicket now, Faf Du Plessis appreciating, What a run-out by Mohammad SirajVideo 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.