Join us  

IPL 2023, RCB vs SRH Live : १४ चेंडूंत ६८ धावा; हेनरिच 'क्लास'न! शतकवीराने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे टेंशन वाढवले

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : सनरयाझर्स हैदराबादने घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात नवे डावपेच आखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 9:03 PM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Live Marathi : सनरयाझर्स हैदराबादने घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात नवे डावपेच आखले. राहुल त्रिपाठीला पुढे पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यशस्वी होऊ दिला नाही, परंतु फॉर्मात असलेल्या हेनरिच क्लासेनने ( Heinrich Klaasen) अफलातून खेळ केला आणि त्याने ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले. यंदाच्या पर्वातील तो सातवा शतकवीर ठरला. 

प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आज त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. SRH चे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, परंतु घरच्या मैदानावर विजयाने शेवट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.RCB ने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. SRH ने आज सलामीला राहुल त्रिपाठी आणि अभिषेक वर्मा ही जोडी पाठवली. फॉर्माशी झगडत असलेला त्रिपाठी गोंधळलेला दिसला.. मायकेल ब्रेसवेलने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेकला ( ११) बाद केले, SRHला २७ धावांवर पहिला धक्का बसला. एडन मार्करामही फलंदाजीला आज वरच्या क्रमांकावर आला. ब्रेसवेलने तिसऱ्या षटकात त्रिपाठीला ( १५) चूक करण्यास भाग पाडले अन् SRHला दुसरा धक्का दिला. ( पाहा दोन्ही विकेट्स

फॉर्मात असलेल्या हेनरिच क्लासेन आणि मार्कराम यांनी SRHच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. क्लासेनने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना SRHची धावगती वाढवली. शाहबाज अहमदमने १३व्या षटकात मार्कराम व क्लासेन यांची ७६ धावांची ( ५० चेंडू) भागीदारी तोडली. मार्करामला १८ धावांवर त्याने त्रिफळाचीत केले.  ( पाहा मार्करामची विकेट ) पण, क्लासेन काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हता आणि त्याने १७व्या षटकात शाहबाजला सलग दोन खणखणीत षटकार खेचले, त्या षटकात त्याने हॅरी ब्रूकसह १९ धावा चोपल्या. हॅरी ब्रूक आज पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् तो क्लासेनला चांगली साथ देताना दिसला.

क्लासेनने ९७ धावांवर असताना खणखणीत षटकार मारून शतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांसह आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. आयपीएल २०२३ मधील तो सातवा शतकवीर ठरला. हर्ष पटेलने संथ चेंडू टाकून क्लासेनचा दांडा उडवला. त्याने ५१ चेंडूंत १०४ धावा केल्या. त्याने ब्रूकसह ३६ चेंडूंत ७४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून बंगळुरूसमोर तगडे लक्ष्य ठेवले. सिराजने २०व्या षटकात चार धावा देत एक विकेट घेतली. ब्रूक २७ धावांवर नाबाद राहिला.  

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App