नवी दिल्ली : कर्णधार शिखर धवनवर विसंबून राहणे ही पंजाब किंग्सची फार मोठी चिंता असल्याचे मत भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. आयपीएलचे जेतेपद पटकवायचे झाल्यास संघातील अन्य खेळाडूंनादेखील जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे भज्जी म्हणाला.
पंजाबकडून आतापर्यंतच्या सामन्यात धवनने चार डावांत २३३ धावा काढल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात संघाने दोन सामने जिंकले तर दोन गमावले. खांद्याच्या दुखापतीमुळे तो लखनौविरुद्ध खेळू शकला नव्हता. सॅम करणच्या नेतृत्वात संघाने विजय मिळविला होता.
हरभजन म्हणाला, ‘माझ्या मते पंजाब संघ फलंदाजीत कर्णधार शिखर धवन याच्यावर फार विसंबून असतो. हा चिंतेचा विषय ठरतो. एका खेळाडूवर विसंबून राहिल्याने तुम्ही दोन किंवा तीन सामने जिंकू शकता; पण आयपीएलसारख्या स्पर्धेचे जेतेपद पटकवू शकणार नाही.’