IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. किरॉन पोलार्ड याला आयपीएल २०२३साठी संघाबाहेर बसवले जाणार याची कल्पना आधीच आली असल्याने त्याने IPL मधून निवृत्ती घेतली. त्याच्याकडे आता मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) फलंदाज प्रशिक्षकाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने पोलार्डनंतर संघातील १३ खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात बहुतांश गोलंदाज आहेत.
काव्या मारनने कर्णधारांचाच पत्ता कापला; केन विलियम्सनसह १२ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला
९४ सामने खेळवले जाणार... संघ संख्या दहाच ठेवली जाणार आहे, परंतु पुढील ५ वर्षांत सामन्यांची संख्या टप्प्याटप्य्याने वाढवण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितले. २०२२मध्ये गुजरात व लखनौ हे दोन नवीन फ्रँचायाझी दाखल झाले आणि आयपीएलमध्ये ७४ सामने ( साखळी फेरीचे ७० + प्ले ऑफचे ४ ) खेळवले गेले. प्रत्येक संघाने साखळी फेरीत १४ सामने खेळले. पण, आता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या व चौथ्या वर्षी सामन्यांची संख्या १०ने वाढवण्यात येईल आणि पाचव्या वर्षी ही संख्या २० ने वाढवून ९४ इतकी केली जाईल.
- आयपीएल २०२३ - ७४ सामने- आयपीएल २०२४ - ७४ सामने- आयपीएल २०२५ - ८४ सामने- आयपीएल २०२६ - ८४ सामने- आयपीएल २०२७ - ९४ सामने
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians - full update)
रिलीज केलेले खेळाडू - किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बसील थम्पी, डॅनिएल सॅम्स, फॅबियन अॅलेन, जयदेव उनाडकत, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिली मेरेडिथ, संजय यादव, टायमल मिल्स ( Players released: Kieron Pollard, Anmolpreet Singh, Aryan Juyal, Basil Thampi, Daniel Sams, Fabian Allen, Jaydev Unadkat, Mayank Markande, Murugan Ashwin, Rahul Buddhi, Riley Meredith, Sanjay Yadav, Tymal Mills)
ट्रेडिंग विंडो - जेसन बेहरेनडॉर्फ
पर्समधील शिल्लक रक्कम - २०.५५ कोटी
परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ३
संघात कायम राहिलेले खेळाडू - रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, त्रिस्तान स्तब्ब्स, डेवॉल्ड ब्रेव्हिस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्षद खान, कुमार कार्तिकेया, हृतिक शोकीन, आकाश माधवल ( Current squad: Rohit Sharma (capt), Tim David, Ramandeep Singh, Tilak Varma, Suryakumar Yadav, Ishan Kishan, Tristan Stubbs, Dewald Brevis, Jofra Archer, Jasprit Bumrah, Arjun Tendulkar, Arshad Khan, Kumar Kartikeya, Hrithik Shokeen, Jason Behrendorff, Akash Madhwal)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"