Join us  

IPL 2023 Retention : Chennai Super Kings ने ड्वेन ब्राव्होची साथ सोडली, संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली

IPL 2023 Retention :  कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार पॅट कमिन्ससह,  सॅम बिलिंग्स व अॅल्स हेल्स यांनीही  आयपीएल २०२३ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 6:27 PM

Open in App

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.  कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार पॅट कमिन्ससह,  सॅम बिलिंग्स व अॅल्स हेल्स यांनीही  आयपीएल २०२३ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. Chennai Super Kings ने स्टार खेळाडू  ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) याला रिलीज केले. किरॉन पोलार्डने आयपीएल मधून निवृत्ती घेतल्यानंतर ड्वेन ब्राव्हो हा विंडीजचा स्टार आयपीएलमध्ये दिसणार होता, परंतु CSK ने त्याला रिलीज केले. आता लिलावात त्याच्यावर कोण बोली लावतं याची उत्सुकता आहे.

ब्राव्होने २०१३ व २०१५ मध्ये पर्पल कॅप जिंकली होती. त्याने आयपीएलच्या २०१३ पर्वात घेतलेल्या ३२ विकेट्स या आयपीएल इतिहासातील एका पर्वातील सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्राव्होसह इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन यालाही रिलीज केले गेले आहे. रॉबिन उथप्पाने निवृत्ती स्वीकारली आहे.   Chennai Super Kings 

रिलीज केलेले खेळाडू - ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ,  नारायण जगदीसन  

पर्समध्ये किती रक्कम - २०.४५ कोटी

परदेशी खेळाडूंची रिक्त जागा - २

संघात कायम राहिलेले खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हणंगर्गेकर, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीष पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महीष थिक्साना ( Current squad: MS Dhoni (capt), Devon Conway, Ruturaj Gaikwad, Ambati Rayudu, Subhranshu Senapati, Moeen Ali, Shivam Dube, Rajvardhan Hangargekar, Dwaine Pretorius, Mitchell Santner, Ravindra Jadeja, Tushar Deshpande, Mukesh Chowdhary, Matheesha Pathirana, Simarjeet Singh, Deepak Chahar, Prashant Solanki, Maheesh Theekshana) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावड्वेन ब्राव्होचेन्नई सुपर किंग्स
Open in App