IPL 2023 Retention : Kavya Maranने कर्णधारांचाच पत्ता कापला; Kane Williamson सह १२ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला 

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 06:40 PM2022-11-15T18:40:47+5:302022-11-15T18:41:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Retention : Kane Williamson and Nicholas Pooran have been released by Sunrisers Hyderabad, See full list | IPL 2023 Retention : Kavya Maranने कर्णधारांचाच पत्ता कापला; Kane Williamson सह १२ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला 

IPL 2023 Retention : Kavya Maranने कर्णधारांचाच पत्ता कापला; Kane Williamson सह १२ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.  

चेन्नई सुपर किंग्सने ड्वेन ब्राव्होची साथ सोडली, संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली

सनरायझर्स हैदराबादने कर्णधारालाच संघाबाहेर केले
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या संघात असलेल्या दोन राष्ट्रीय संघांच्या कर्णधारांना घरचा रस्ता दाखवला. कर्णधार केन विलियम्स आणि निकोलस पूरन यांना SRH  ने रिलीज केले आहे.  विलियम्ससाठी हैदराबादने सर्वाधिक १४ कोटी रुपये मोजले होते आणि तो ८ वर्ष या फ्रँचायझीसोबत खेळला. त्याने ७६ सामन्यांत ३६.२२ च्या सरासरीने २१०१ धावा केल्या. यापैकी ४६ सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्व सांभाळले. मागच्या पर्वात राशिद खान गुजरात टायटन्सकडे गेल्यानंतर हैदराबादने विलियम्सला संघात कायम राखण्यास प्राधान्य दिले.  निकोलस पूरनसाठी त्यानी १०.७५ कोटी रुपये लिलावात मोजले होते. आता या दोन खेळाडूंना रिलीज केल्यने हैदराबादच्या खात्यात २४.७५ लाख रुपये वाढले आहेत.  t.

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad )  

रिलीज केलेले खेळाडू - केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद 

पर्समध्ये शिल्लक रक्कम - ४२.२५ कोटी 

परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा - ४ 

कायम राखलेले खेळाडू - अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक ( Current squad: Abdul Samad, Aiden Markram, Rahul Tripathi, Glenn Phillips, Abhishek Sharma, Marco Jansen, Washington Sundar, Fazalhaq Farooqi, Kartik Tyagi, Bhuvneshwar Kumar, T Natarajan, Umran Malik) 

कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार पॅट कमिन्ससह,  सॅम बिलिंग्स व अॅल्स हेल्स यांनीही  आयपीएल २०२३ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. Chennai Super Kings ने स्टार खेळाडू  ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) याला रिलीज केले. किरॉन पोलार्डने आयपीएल मधून निवृत्ती घेतल्यानंतर ड्वेन ब्राव्हो हा विंडीजचा स्टार आयपीएलमध्ये दिसणार होता, परंतु CSK ने त्याला रिलीज केले. आता लिलावात त्याच्यावर कोण बोली लावतं याची उत्सुकता आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

Web Title: IPL 2023 Retention : Kane Williamson and Nicholas Pooran have been released by Sunrisers Hyderabad, See full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.