IPL 2023 Retention Kieron Pollard Retire : मुंबई इंडियन्सच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने १३ हंगाम MIकडून खेळल्यानंतर IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १८९ सामन्यांत ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत. पण, तो आता नव्या भूमिकेतून MI कुटुंबासोबत सुरू ठेवणार आहे. पोलार्डला २०१० मध्ये मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले आणि तेव्हापासून मुंबई इंडियन्ससोबत 5 IPL आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकून या पिढीतील महान खेळाडूंपैकी एक बनला आहे. पोलार्ड नेहमी #MIForever मध्ये आहे आणि राहील. त्याचा अनेक दशकांचा अनुभव आणि कौशल्य मुंबई इंडियन्सला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि MI Emirates सह खेळाडू म्हणून उपयोगी येईल.
मुंबई इंडियन्सने संघातून बाहेर काढला, किरॉन पोलार्डने निवृत्तीचा मार्ग पकडला; केलं मन मोकळं
आकाश अंबानी म्हणाले, “पॉलीने मुंबई इंडियन्ससोबत एक खेळाडू म्हणून मोठा वारसा सोडला आहे. प्रत्येक वेळी तो मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी गर्जना केली. MI कुटुंबातील एक मौल्यवान सदस्य आणि एक चांगला मित्र, त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीमध्ये अत्यंत वचनबद्धतेने क्रिकेटचा सुंदर खेळ खेळला. पॉली मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि Mi Emirates चा खेळाडू म्हणून MI कुटुंबाचा एक भाग बनून राहिल्याबद्दल आनंद झाला. आम्हाला विश्वास आहे की, जेव्हा तो आमच्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पॉली जसा होता तसाच तो प्रशिक्षकाप्रमाणेच गतिमान आणि प्रभावशाली असेल. मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम आणि पलटण यांना मैदानावर खेळायला त्याची उणीव भासत असली तरी त्याची अंतर्दृष्टी संघासाठी अमूल्य असेल.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"