Join us  

Kieron Pollard Retire : Mumbai Indiansने संघातून वगळलं, किरॉन पोलार्डनं IPL सोडलं; जाता जाता मन मोकळं केलं

हा निर्णय माझ्यासाठी घेणं सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची होती,  परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, असे पोलार्ड म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 1:59 PM

Open in App

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. या ऑक्शनआधी ट्रेडिंग विंडोतून कोलकाता नाइट रायडर्सने ( Kolkata Knight Riders)  ल्युकी फर्ग्युसन व रहमनुल्लाह गुर्बाझ यांना गुजरात टायटन्सकडून, तर दिल्ली कॅपिटल्सच्या शार्दूल ठाकूरला आपल्या ताफ्यात घेतले. मुंबई इंडियन्स IPL 2023 मध्ये संघातील सर्वात अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याला वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूनेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.

''हा निर्णय माझ्यासाठी घेणं सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची होती,  परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या फ्रँचायझीसोबतचा प्रवास अविश्वसनीय होता आणि मी बरंच काही साध्य केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध मी खेळू शकत नाही,''असे पोर्लाडने ट्विट केले. 

''मुंबई इंडियन्सला गुडबाय बोलताना खूप दुःख होतंय. पण, मी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यास तयार आहे आणि मुंबई इंडियन्स एमिरेट्सकडून खेळणार आहे. हा नवा चॅप्टर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे,'' असेही तो म्हणाला. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १८९ सामन्यांत ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत.

तो पुढे म्हणाला, आयपीएलमधील सर्वात यशस्वी  संघासोबत १३ वर्ष खेळायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. पण, आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करणार आहे. स्टेडियममधील तो आवाज, जयघोषाचा तो नारा, सर्व काही. आम्ही एकत्र मिळून २०११ व २०१३ ची चॅमियन्स ट्रॉफी जिंकली आणि २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये आयपीएल जेतेपद जिंकले.

टॅग्स :आयपीएल २०२२किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्सआयपीएल लिलाव
Open in App