Kieron Pollard : Mumbai Indians ने DP बदलला, किरॉन पोलार्डच्या प्रवासाचा Emotional Video तयार केला; पोस्ट व्हायरल

IPL 2023 Retention Kieron Pollard Retire : किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १८९ सामन्यांत ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:26 PM2022-11-15T15:26:09+5:302022-11-15T15:29:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Retention : Mumbai Indians pay a small tribute for Kieron Pollard, Watch Video  | Kieron Pollard : Mumbai Indians ने DP बदलला, किरॉन पोलार्डच्या प्रवासाचा Emotional Video तयार केला; पोस्ट व्हायरल

Kieron Pollard : Mumbai Indians ने DP बदलला, किरॉन पोलार्डच्या प्रवासाचा Emotional Video तयार केला; पोस्ट व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Retention Kieron Pollard Retire : मुंबई इंडियन्सच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने १३ हंगाम MIकडून खेळल्यानंतर IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १८९ सामन्यांत ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत. पण, आता तो मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या UAE लीगमध्ये असलेल्या MI Emirates संघाकडून तो खेळणार आहे. मुंबई इंडियन्ससोबतचा खेळाडू म्हणून प्रवास संपत असताना फ्रँचायझीने इमोशनल व्हिडीओ पोस्ट करून वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूला   कडक सलाम ठोकला आहे. इतकंच नव्हे, तर मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावरील सर्व DP पोलार्डचा फोटो ठेवला आहे. 


''हा निर्णय माझ्यासाठी घेणं सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची होती,  परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या फ्रँचायझीसोबतचा प्रवास अविश्वसनीय होता आणि मी बरंच काही साध्य केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध मी खेळू शकत नाही,''असे पोर्लाडने ट्विट केले. 

''मुंबई इंडियन्सला गुडबाय बोलताना खूप दुःख होतंय. पण, मी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यास तयार आहे आणि मुंबई इंडियन्स एमिरेट्सकडून खेळणार आहे. हा नवा चॅप्टर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी  संघासोबत १३ वर्ष खेळायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. पण, आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करणार आहे. स्टेडियममधील तो आवाज, जयघोषाचा तो नारा, सर्व काही. आम्ही एकत्र मिळून २०११ व २०१३ ची चॅमियन्स ट्रॉफी जिंकली आणि २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये आयपीएल जेतेपद जिंकले, असे तो म्हणाला. 


 


मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी म्हणाल्या, “ पोलार्डने मुंबई इंडियन्सचा अर्थ काय आहे याचे उदाहरण दिले आहे. खेलेंगे दिल खोल के! सीझन ३ पासूनच, आम्ही आनंद आणि अश्रू याचे साक्षीदार आहोत.  त्या भावना ज्या मैदानावर आणि मैदानाबाहेर आयुष्यभर बंध निर्माण करतात. त्याने MI च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  मला आनंद आहे की तो MI Emirates साठी खेळत राहील आणि MI चे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करेल. MI आणि MI Emirates सोबतचा त्याचा नवा प्रवास त्याला आणखी मोठे वैभव, विजय आणि पूर्तता देईल. मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते”

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

Web Title: IPL 2023 Retention : Mumbai Indians pay a small tribute for Kieron Pollard, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.