IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ऑक्शनपूर्वी ट्रेडिंग विंडोतून कोलकाता नाइट रायडर्सने ( Kolkata Knight Riders) ल्युकी फर्ग्युसन, रहमनुल्लाह गुर्बाझ आणि शार्दूल ठाकूर यांना आपल्या संघात घेतले. पॅट कमिन्सने आयपीएलमधून माघार घेतल्याने KKR ला धक्का बसला, त्यात मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. कोलकाताला आयपीएल २०२३पूर्वी धक्केही बसले.
शार्दूलसाठी आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपये मोजले होते. शार्दूलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स व पंजाब किंग्स हेही प्रयत्नशील होते, परंतु कोलकाताने बाजी मारली. आयपीएल २०२२ मध्ये शार्दूलने १४ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय त्याने १२० धावाही केल्या होत्या. शार्दूलच्या जागी दिल्लीने KKRच्या अमन खानला आपल्या संघात दाखल केले.
कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार पॅट कमिन्ससह, सॅम बिलिंग्स व अॅल्स हेल्स यांनीही आयपीएल २०२३ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. कमिन्स २०१४ मध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) मधून आयपीएल पदार्पण केले. पॅट कमिन्स २०१८ आणि २०१९ वगळता २०१४ पासून आयपीएलचा भाग आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून ६ पैकी ५ सीझन खेळले आहेत. कमिन्स आयपीएल २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता. IPL 2022 च्या मेगा लिलावात KKR ने पॅट कमिन्सला ७.२५ कोटींना अष्टपैलू कॅटेगरीत विकत घेतले होते.
पॅट कमिन्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून मागील तीन आयपीएल हंगाम खेळले आहेत. कमिन्सने गेल्या वर्षी पुण्यात IPL 2021 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. कमिन्सने या पराक्रमामुळे केएल राहुलच्या आयपीएलमधील आतापर्यंत सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या विजयाचा स्टार हेल्सला १.५ कोटींत केकेआरने आपल्या ताफ्यात घेतले होते. या बिलिंग्सनेही राष्ट्रीय कर्तव्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"