Join us  

IPL 2023 Retention : शार्दूल ठाकूर KKR कडून खेळणार! चेन्नई, गुजरात, पंजाबवर मात; दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी वाचवले

IPL 2023 Retention : आता IPL 2023 पूर्वी मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 3:19 PM

Open in App

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. गतवर्षी दोन संघ नव्याने दाखल झाल्यामुळे मेगा ऑक्शन पार पडले होते आणि त्यानंतर सर्वच संघांना नव्याने बांधणी करावी लागली होती. आता IPL 2023 पूर्वी मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. २३ डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी अधिकाधिक पैसे आपल्या पर्समध्ये रहावेत यासाठी फ्रँचायझी खेळाडूंना रिलीज करत आहेत. BCCI मिनी ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्सची किंमत ५ कोटीने वाढवली आहे. या ऑक्शनआधी काही संघ ट्रेडिंग विंडोतून काही खेळाडूंना आपापल्या ताफ्यात घेत आहेत.

IPL 2023 Retention List : धक्कादायक! स्टार खेळाडूंना घरचा रस्ता, Mini Auction साठी फ्रँचायझींची संभाव्य लिस्ट समोर

सध्या तरी कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) ट्रेड करण्यात आघाडीवर असल्याचे दिसतेय. ESPNने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सने भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) याला KKRच्या ताफ्यात दिले आहे. ट्रेडिंग विंडोत KKR ने शार्दूलला आपल्या संघात घेण्यात यश मिळवले. शार्दूल सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तेथे होणाऱ्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी १०.७५ कोटी रुपये मोजले आहेत. आता दिल्लीने शार्दूलला ट्रेड करून IPL 2023 Mini Auction साठी पर्समधील रक्कम १०.७५ कोटीने वाढवली आहे.

IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स संघातील इंग्लंडच्या मॅच विनर खेळाडूने घेतली माघार; २ कोटींचा झाला फायदा

शार्दूलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स व पंजाब किंग्स हेही प्रयत्नशील होते, परंतु कोलकाताने बाजी मारली. आयपीएल २०२२ मध्ये शार्दूलने १४ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय त्याने १२० धावाही केल्या होत्या. ट्रेडिंग विंडोत कोलकाताने सध्या आघाडी घेतली आहे आणि मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ही विंडो बंद होणार आहे. कोलकाताने याआधी ल्युकी फर्ग्युसन व रहमनुल्लाह गुर्बाझ यांना आपल्या ताफ्यात घेतले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सशार्दुल ठाकूरदिल्ली कॅपिटल्स
Open in App