Join us  

IPL 2023 Retention: CSKने ज्याला संघातून काढलं, त्याच फलंदाजाने ५ दिवसांत ठोकली सलग ३ शतके

चेन्नईने मिनी लिलावाआधी तब्बल ८ खेळाडूंना केलं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 3:32 PM

Open in App

IPL 2023 Retention, CSK: इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनआधी संघांनी अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. MS Dhoni च्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघानेही आपल्या ८ खेळाडूंना Release केले. पण त्याच वेळी CSK ने संघाबाहेर केलेल्या खेळाडूने कमाल करून दाखवली. त्याने एक-दोन नाही, तर सलग तीन शतके ठोकली.

चेन्नईच्या संघाने ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, एडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ आणि नारायण जगदीसन या खेळाडूंना संघाबाहेर काढले. त्यापैकी तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने मात्र फलंदाजीत वेगळाच जलवा दाखवला. त्यानंतर नारायण जगदीशनला न्याय देण्यात CSKने थोडीशी गल्लत केली, अशी कुजबूज सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने जगदीशनला म्हणावी तशी संधी दिली नाही. पण विजय हजारे स्पर्धेत मात्र त्याला मिळालेल्या संधीचे त्याने सोनं केलं.

पुढील महिन्यात IPL 2023 चा मिनी लिलाव होणार आहे. त्या आधी विजय हजारे स्पर्धेत तो आपल्या बॅटने चांगलीच फटकेबाजी करताना दिसतोय. तामिळनाडू संघाच्या 373 धावांमध्ये एकट्या जगदीशनने 168 धावा केल्या आहेत. तामिळनाडूचा सलामीवीर नारायण जगदीशनने विजय हजारे करंडक स्पर्धेत गोवा संघाविरुद्ध सलग तिसरे शतक झळकावले. यावेळी त्याने 140 चेंडूत 168 धावा केल्या. जगदीशनच्या खेळीत 15 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे तामिळनाडूने 50 षटकांत 373 धावांची मजल मारली.

5 दिवसात सलग तिसरे शतक

CSKकडून रिलीज झाल्यानंतर गोव्याविरुद्ध नारायण जगदीशनचे शतक हे सलग दुसरे शतक आहे. तर गेल्या ५ दिवसांत नारायण जगदीशनचे हे सलग तिसरे शतक ठोकले आहे. 17 नोव्हेंबरला गोव्याविरुद्ध 168 धावा करण्यापूर्वी त्याने 15 नोव्हेंबरला छत्तीसगडविरुद्ध 107 आणि 13 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशविरुद्ध नाबाद 114 धावा केल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल लिलाव
Open in App