Rinku Singh: ५ चेंडूत ५ षटकार ठोकत रिंकू सिंगने नोंदवले ५ विक्रम; ते नेमके कोणते आहेत?, जाणून घ्या...!

Rinku Singh: रिंकूने आपल्या या आक्रमक खेळीने ५ विक्रम नावावर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 09:02 AM2023-04-10T09:02:01+5:302023-04-10T09:47:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: Rinku Singh has made 5 major records against Gujarat Titans in IPL. | Rinku Singh: ५ चेंडूत ५ षटकार ठोकत रिंकू सिंगने नोंदवले ५ विक्रम; ते नेमके कोणते आहेत?, जाणून घ्या...!

Rinku Singh: ५ चेंडूत ५ षटकार ठोकत रिंकू सिंगने नोंदवले ५ विक्रम; ते नेमके कोणते आहेत?, जाणून घ्या...!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अखेरच्या घटकात विजयासाठी २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने वेगवान गोलंदाज यश दयालला सलग पाच षटकार खेचले. रिंकूच्या या तडाख्याच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने हातातून गेलेला सामना जिंकताना गुजरात टायटन्सला तीन गड्यांनी नमवले. यासह कोलकाताने गुजरातला विजयी हॅटट्रिकपासून दूर ठेवले. विशेष म्हणजे, गुजरातचा हंगामी कर्णधार राशीद खानने घेतलेली हॅटट्रिकही रिंकूपुढे वाया गेली.

इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणली होती. पण, गुजरातचा कर्णधार राशीद खानने हॅटट्रिक घेताना मॅच फिरवली. ६ चेंडूंत २९ धावा हव्या असताना कोलकाता हा सामना जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रिंकू सिंगला उमेश यादवने एक धाव घेत स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकून १,२,३ नव्हे तर सलग पाच षटकार खेचले अन्  कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी रिंकूला मिठी मारली अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

“झूम जो रिंकू!!!” रिंकू सिंगच्या खेळीची शाहरुख खानलाही भुरळ; खास ट्विट करत केलं कौतुक

रिंकूने आपल्या या आक्रमक खेळीने ५ विक्रम नावावर केले आहेत. आगामी काळात रिंकूचे हे पाच विक्रम कोणत्याही खेळाडूला तोडणं सहजरित्या शक्य होणार नाही. ते पाच विक्रम नेमके कोणते आहेत, जाणून घ्या...

. धावांचा पाठलाग करताना डावाच्या शेवटच्या आणि २०व्या षटकात फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा

. धावांचा पाठलाग करताना डावाच्या २०व्या षटकात सलग पाच षटकार मारण्याचा विक्रम

३. धावांचा पाठलाग करताना डावाच्या शेवटच्या षटकात ३१ धावा करण्याचा विक्रम.

४. रिंकू सिंगने सलग ७ चेंडूत ४० धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने केलेला हा विक्रम आहे.

५. एका वेबसाइटनुसार, शेवटच्या षटकात जेव्हा कोलकाताला सामना जिंकण्यासाठी २९ धावा हव्या होत्या. तेव्हा कोलकाता संघाची सामना जिंकण्याची शक्यता ९९.९६ येवढी होती. ही देखील एक मनोरंजक गोष्ट आहे की या परिस्थितीतून भविष्यात कोणताही फलंदाज आपल्या संघासाठी सामना जिंकेल.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना गुजरातने आयपीएलमध्ये प्रथमच द्विशतकी मजल मारताना २० षटकांत चार बाद २०४ धावा केल्या. हे आव्हान अखेरच्या चेंडूवर पार केलेल्या कोलकाताने २० षटकांत सात बाद २०७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना कोलकाताची अडखळती सुरुवात झाल्यानंतर इम्पैक्ट खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या व्यंकटेश अय्यरने प्रभावी फटकेबाजी केली. त्याला कर्णधार नितीश राणाने चांगली साथ दिली.

थरारक षटक

व्यंकटेश राणा यांनी तिसया गड्यासाठी ५५ चेंईत १०० धावांची भागीदारी केली. अय्यर बाद झाल्यानंतर १७च्या षटकात राशीदने गुजरातला पकड मिळवून देत आहे रसेल, सुनील नरेन व शार्दुल ठाकूर यांना सलग तीन चेंडूवर बाद केले. मात्र, अखेरच्या षटकात रिंकूने सामना फिरवताना गुजरातच्या हातातून सामना खेचून आणला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023: Rinku Singh has made 5 major records against Gujarat Titans in IPL.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.