Rinku Singh, IPL 2023 KKR vs GT: चांगले तंत्र, लढाऊ वृत्ती, हिंमत, क्षमता आणि आवड असे सारे गुण क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असता. एखाद्या खेळाडूमध्ये हे गुण असतील तर त्याची चांगली कामगिरी होणे स्वाभाविक आहे. असे असूनही, कधीकधी असे प्रसंग येतात, जेव्हा या साऱ्या क्षमता पुरेशा नसतात, त्यासोबत आत्मविश्वासही हवा असतो आणि पाठिंबाही लागतो. सध्या IPL मध्ये रिंकू सिंगने मारलेले पाच षटकार भलतेच गाजताना दिसत आहेत. पण त्यासोबतच आता त्याचा साथीदार उमेश यादव याने त्याला सांगितलेले ते चार शब्दही चांगलेच चर्चेत आले आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवार ९ एप्रिल रोजी संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना लोक कधीही विसरू शकणार नाहीत. टीव्ही, मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर कोणीही हा सामना पाहिला असेल, तर तो त्यांच्या कायम लक्षात राहील. या सामन्यातील हिरो रिंकू सिंगदेखील त्यांच्या चांगलाच लक्षात राहिल. पण रिंकू सिंगमध्ये ते पाच षटकार मारण्यासाठी ज्या उमेश यादवने आत्मविश्वास भरला, त्याबद्दल आता एक गोष्ट समोर आली आहे.
उमेशचे शब्द, रिंकूचे षटकार
गुजरातच्या 205 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोलकाताला शेवटच्या षटकात 29 धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत रिंकूला स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकू सिंगने पुढचे 5 चेंडू सीमारेषेबाहेर पाठवून केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला. आपल्या ऐतिहासिक पराक्रमानंतर रिंकूने सांगितले की, मला स्वत:वर विश्वास होताच पण उमेश यादवच्या त्या चार शब्दांनी मला प्रोत्साहन दिले. सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान, रिंकूने उमेशचे शब्द सांगितले की तो फक्त म्हणाला होता - "लगा रिंकू, सोचियो मत" (तू फटके मारत राहा, कसलाही विचार करू नको), आणि त्यानंतर रिंकूने यश दयालला ५ षटकार ठोकले.
उमेशचे छोटे पण महत्त्वाचे योगदान
उमेशबद्दल सांगायचे तर हा सामना त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या खास नव्हता, पण तरीही त्याचे योगदान खूप खास होते. प्रथम उमेशने धावांचा वेग वाढवणाऱ्या शुभमन गिलचा झेल टिपला. यानंतर ३६ चेंडूंत ३१ धावांची अशी खेळी खेळली. त्यामुळे शेवटचा केकेआर बचावला. उमेशने रिंकूसोबत 21 चेंडूत 52 धावांची नाबाद भागीदारी केली. यामध्ये उमेशने केवळ एक बाजू लावून धरली होती. 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिंकूला स्ट्राईक देऊन आपले काम पूर्ण केले.