IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

Rohit Sharma: रोहित शर्माचा 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि याच दिवशी त्याला एक भव्य-दिव्य गिफ्ट मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:42 PM2023-04-28T18:42:25+5:302023-04-28T18:43:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: Rohit Sharma to get special birthday gift from Hyderabad on hin birthday; Photo viral | IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Rohit Sharma: रविवार(दि.30)चा दिवस खूप खास राहणार आहे. रविवारी IPL चे दोन सामने होणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होईल, तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल. हा सामना आयपीएलचा 1000 वा सामना असेल. विशेष म्हणजे, 30 तारखेला रोहित शर्माचा वाढदिवस आहे. या दिवशी रोहितला एक खास भेट मिळणार आहे.

रोहितला हैदराबाद भेट देणार 
मुंबई आणि राजस्थानचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहितचा वाढदिवस देखील 30 एप्रिलला आहे आणि या दिवशी त्याला एक खास भेट मिळणार आहे. रोहितने मुंबईला पाचवेळा आयपीएल जिंकून दिले आहे. पण, त्याला खास भेट मुंबईत नाही, तर 700 किमी दूर हैदराबादमध्ये मिळणार आहे. 

रोहित-हैदराबादचे खास नाते
हैदराबादमध्ये रोहितचा 60 फूट उंच कटआउट बसवण्यात येणार आहे. रोहितच्या वाढदिवशी त्याचे अनावरण होईल. या कट आऊटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हैदराबाद आणि रोहितचे खास नाते आहे. रोहितने हैदराबादची फ्रेंचायझी डेक्कन चेजर्समधून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि 2009 मध्ये पहिले आयपीएल जिंकले होते.

मुंबईची परिस्थिती वाईट आहे
पाच वेळच्या विजेत्या मुंबईचा सध्याचा हंगाम चांगला जात नाहीय. या हंगामात संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. यापैकी तीनमध्ये त्यांना विजय मिळाला आहे, तर चारमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. रोहितच्या संघाला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर उर्वरित सातही सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.
 

Web Title: IPL 2023: Rohit Sharma to get special birthday gift from Hyderabad on hin birthday; Photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.