Join us  

IPL 2023 : रोहित शर्मा काही सामने नाही खेळणार, सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार? मार्क बाऊचर म्हणाले... 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वाला ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्स २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल २०२३तील मोहिमेला सुरुवात करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 4:05 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वाला ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्स २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल २०२३तील मोहिमेला सुरुवात करणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यंदाच्या पर्वातील ध्येयाबद्दल सांगितले. सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार दोघांनीही बोलून दाखवला. पण, त्याचवेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन भारतीय खेळाडूंवरील वर्क लोडचा मुद्दा समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर रोहितने या मुद्यावर मत मांडले होते. पण, आता समोर आलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२३ मध्ये रोहित काही सामने खेळणार नाही आणि त्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादव कर्णधारपद भूषविणार असल्याचे कळत आहे.

रोहित शर्माने मानले मुंबई इंडियन्सचे आभार; व्यक्त केला सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार 

रोहित हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने विक्रमी पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. MI च्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मधील हे सर्व विजय रोहितच्या नेतृत्वाखाली आले आहेत. आयपीएलच्या  अंतिम फेरीच्या अवघ्या नऊ दिवसांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०२३ च्या WTC Finalमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल लंडनमधील ओव्हल येथे ७ जूनपासून खेळवली जाणार आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये विश्रांती घेऊ शकतो. रोहितने आयपीएलदरम्यान विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यास सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करू शकतो, असे याच अहवालात म्हटले आहे. किरॉन पोलार्डच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमारला ही संधी मिळू शकते. याबाबत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले, आम्ही खेळाडूंच्या वर्क लोडवर काम करणार आहोत. रोहित शर्माला जर विश्रांतीची गरज भासल्यास १-२ सामने त्याला आराम दिला जाऊ शकतो. त्यात आम्हाला काहीच अडचण नाही.'' 

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन,  जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्स
Open in App