IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा दुसरा टप्पा अधिक रंजक होत चालला आहे... काल झालेल्या दोन्ही सामन्यांत २००+ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग होताना सर्वांनी पाहिले. प्ले ऑफच्या शर्यतीत आता आघाडीवर असणाऱ्या संघांचा मार्ग सोपा नक्कीच नाही, हेच त्यावरून दिसले. त्यात ८ गुणांसह तालिकेत सहाव्या क्रमांकावर असेलल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) नवीनच प्लान आखला. त्यांनी केदार जाधवला ( Kedar Jadhav) आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. डेव्हिड विली याची रिप्लेसमेंट म्हणून केदार जाधव RCBच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अन् सध्या मराठी समालोचन करणाऱ्या केदारच्या अनपेक्षित एन्ट्रीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. इंग्लंडचा ऑल राऊंडर विली यंदाच्या आयपीएलमझ्ये RCBसाठी चार सामने खेळला अन् ३ विकेट्स घेतल्या. पण, त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. केदारने २०१०मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि त्याने ९३ सामन्यां त११९६ धावा केल्या आहेत. त्याने RCB कडून १७ सामने खेळले आहेत. १ कोटींच्या मुळ किमतीत तो आता पुन्हा बंगळुरूच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
तीन वर्षांनंतर त्याने जानेवारी २०२३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पहिल्याच सामन्यात २८३ धावा केल्या होत्या.
प्ले ऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यापाठोपाठ लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स व पंजाब किंग्स हे प्रत्येकी १० गुणांसह टॉप फाईव्ह मध्ये आहेत. RCB सह मुंबई इंडियन्सचे ८, कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबादचे प्रत्येकी ६ व दिल्ली कॅपिटल्सचे ४ गुण आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 : Royal Challengers Bangalore Name Kedar Jadhav As Replacement For David Willey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.