IPL 2023, Rajasthan Royals vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरले खरे, परंतु राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्यांचे बोल्ट टाईट करून टाकले. न्यूझीलंडच्या गोलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये तीन सामन्यातं दुसऱ्यांदा पहिल्या षटकात दोन विकेट मेडन अशी गोलंदाजी केली आहे.
मोठ्या कंपनीच्या मालकीणला पटवलं अन् आता IPL 2023 मध्येच सोडलं; पाहा ब्युटीचे फोटो
राजस्थान रॉयल्सने आज पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी वादळी सुरूवात केली आणि ८.३ षटकांत ९८ धावा चढवल्या. यशस्वी ३१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ६० धावांवर माघारी परतला. संजू सॅमसन ( ०) व रियान पराग ( ७) अपयशी ठरल्याने राजस्थानच्या धावांचा वेग मंदावला होता. बटलर व शिमरोन हेटमायर या जोडीने तो वेग पुन्हा मिळवून दिला. बटलरने ५१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७९ धावा चोपल्या. हेटमायरनेही २१ चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी करताना १ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचले. राजस्थानने ४ बाद १९९ धावा करून दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे लक्ष्य ठेवले.
प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या पृथ्वी शॉ याला दिल्लीने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरवले. पृथ्वीची बॅट अद्याप अपेक्षित तळपलेली नाही, परंतु आजच्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा होत्या. पण, ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्याला अपयशी ठरवले. आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक १९ विकेट्स बोल्टच्या नावावर आहेत आणि त्याने पृथ्वीला आयपीएलमध्ये चौथ्यांदा बाद केले आहे. बोल्टचा चेंडू पृथ्वीच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने गेला अन् संजूनेही उजव्या बाजूला झेप घेत अप्रतिम झेल घेतला. आज खेळण्याची संधी मिळालेला मनीष पांडे ( ०) पहिल्याच चेंडूवर LBW झाला. बोल्टने पहिल्या षटकात DC ला दोन धक्के दिले.
रायली रूसो व डेव्हिड वॉर्नर यांनी ३६ धावांची भागीदारी करून दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आर अश्विनने रूसोला १४ धावांवर बाद करून DC ला ३६ धावांत तिसरा धक्का दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, RR vs DC Live : Trent Boult on fire, bowled a double wicket maiden; Captain Sanju Samson take a magnificent catch, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.