IPL 2023, RR Vs DC: यशस्वी भव! जयस्वालकडून दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई, ठोकलं वादळी अर्धशतक 

IPL 2023, RR Vs DC: पहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. केवळ २५ चेंडूंमध्ये जयस्वालने पन्नाशीपार मजल मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:13 PM2023-04-08T16:13:30+5:302023-04-08T16:14:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RR Vs DC: Success Bhava! Jaiswal beat the Delhi bowlers, hit a stormy half-century | IPL 2023, RR Vs DC: यशस्वी भव! जयस्वालकडून दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई, ठोकलं वादळी अर्धशतक 

IPL 2023, RR Vs DC: यशस्वी भव! जयस्वालकडून दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई, ठोकलं वादळी अर्धशतक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी राजस्थान रॉयल्सला तुफानी सुरुवात करून दिली आहे. दरम्यान, पहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वी जयस्वालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. केवळ २५ चेंडूंमध्ये जयस्वालने पन्नाशीपार मजल मारली आहे. जयस्वालच्या या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने या खेळीदरम्यान ११ चौकार ठोकले. पण एवढं वेगवान अर्धशतक ठोकूनही त्याने या खेळीदरम्यान, एकही षटकार ठोकला नाही. 

डावाला सुरुवात झाल्यावर यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर खलील अहमदला खणखणीत चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर यशस्वीने डीप थर्डमॅनला चेंडू फटकावला. तिथे मुकेश कुमारने गफलत केल्याने चेंडू सीमापार गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार ठोकत यशस्वीने चौकारांची हॅटट्रिट केली. चौथा चेंडू निर्धाव गेला. मात्र पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार ठोकत यशस्वीने पहिल्याच षटकात एकूण २० धावा वसूल केल्या.

त्यानंतर अक्षर पटेलने टाकलेल्या पाचव्या षटकात जयस्वालने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेताना तीन चौकार ठोकले. दुसरीकडून जोस बटलर यानेही जयसवालला सुरेख साध दिल्याने पहिल्या सहा षटकांमध्येच राजस्थानने बिनबाद ६८ धावा कुटून काढल्या होत्या. दरम्यान, अक्षर पटेलने टाकलेल्या सातव्या षटकात पुन्हा दोन चौकार ठोकत जयस्वालने २५ चेंडूतच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 

Web Title: IPL 2023, RR Vs DC: Success Bhava! Jaiswal beat the Delhi bowlers, hit a stormy half-century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.